भास
ती भासे मज विद्युलता, नकट्या सरी बरसती लाली बनुन रही ती त्यांच्या मस्तिश्कावरी. मी सुनवतो तमाला “अरे हीच ती नयनदृष्टी, ... आदित्याविस्कार, तुला पुरुन उरे.” ती भासे मज मंद ज्योत रणरागिणी विजयचि प्रेरणा उत्सहाचि मी विनवतो देवाला, “तुजे नि माजे चित्त न गमते तिच्यापरि... तरि का जिव दोघांचा ही तिच्याविन तग धरी?” ती भासे मज अनंताची वाहिनी सागराचा उगम वत्सल्यच आंगण मज न उमजे ती परि तिस जानवे अंतरिचे भाव मी ठणकावे स्वःतालच, “तू याचना ती दिलासा तू घृणा ती माया तू एकरंगी आकाश ती सप्तरंगी इंद्रधनुष.” अंति खरे सत्य हे, मृत्यु न उरे जन्मापरि मी नसे माझा ... तिच्यापरि...