पोस्ट्स

एप्रिल, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्रदिन

इमेज
राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम घ्यावा माझा जय श्री महाराष्ट्र देशा आज तुझा छप्पन्नावा वाढदिवस, निदान आज तरी नकारार्थी बोलायला नको. पण चिंतन नक्की करायला हव. महाराष्ट्रा, तु, विविधतेने नटलेल्या भारतातील एक वैभवशाली राज्य. ज्याचा भूतकाळ महासागराच्या खोलीहून अधिक खोल पण तितकाच ज्वलंत. मोघलाईत पोळणार्‍या उन्हाला, ठेचकाळणार्‍या सह्याद्रीला अन् पिसाळलेळ्या मुघालाला न जुमाणता लढाया करणार्‍यांपासून, गुलामगिरीत लाचारीच्या भाकरीला लाथाडुन बलिदान देणार्‍यांपासून ते तुझ्या निर्मितीच्या रक्तरंजित इतिहासात रक्त सांडणार्‍यांपर्यंत सर्वांचाच तुला अभिमान आहे, माहितेय. पण नंतरच्या काळातही तुझ्या नावाच्या जयघोष सातासमुद्रांपार निनादल. सचिन तेंडुलकर, सुनिल गावस्कर, लता मंगेशकर यांनी तर आपापल्या क्षेत्रात वेगळाच ठसा उमठवला. पण बाकीच्यांनीही तुझ नाव सुवर्ण अक्षरांनी कोरल. वयाच्या ऐकोणिसाव्या वर्षी एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी कृष्णा पाटिल, दुचाकी निर्मितीतला जादुगार वर्डे यांनी स्वतःच वेगळ नाव तयार केल. अस म्हणतात की मराठी माणसाला, तुझ्या भुमीत जन्माला येणार्‍याला व्यवसाय करता येत नाही....