निरोप
निरोप आता बघवत नाही रे निरोप घेण - देण , सहनही होत नाही पण तरीही हसतोय तुझ्या समाधनासाठी मिठागरे गच्च भरलीत डोळ्यातली पिकल पान गळाव , तसच गळतय पाणी त्या मिठागरातून आता आवरताही येईना त्याच्या फुटलेल्या बांधाला आता जीवन अमावस्याच बनून राहिलंय बघ लाखो\चांदण्या असूनही चंद्रच हरवून बसलोय आता चालतानापण एक पाऊल कमी होणार , लंगड्यासारख रहाव लागणार , शब्दांना अर्थाशिवाय , अर्थांना भावनांशिवाय रहाव लागणार , अन खऱ्या अर्थाने मलापण ' महाकाव्याशिवाय ' रहाव लागणार ….