निरोप
निरोप
आता बघवत नाही रे
निरोप घेण - देण ,
सहनही होत नाही
पण तरीही हसतोय
तुझ्या समाधनासाठी
मिठागरे गच्च भरलीत
डोळ्यातली
पिकल पान गळाव ,
तसच गळतय पाणी
त्या मिठागरातून
आता आवरताही येईना
त्याच्या फुटलेल्या बांधाला
आता जीवन अमावस्याच
बनून राहिलंय बघ
लाखो\चांदण्या असूनही
चंद्रच हरवून बसलोय
आता चालतानापण
एक पाऊल कमी होणार ,
लंगड्यासारख
रहाव लागणार ,
शब्दांना अर्थाशिवाय ,
अर्थांना भावनांशिवाय
रहाव लागणार ,
अन खऱ्या अर्थाने
मलापण ' महाकाव्याशिवाय ' रहाव लागणार ….
मलापण ' महाकाव्याशिवाय ' रहाव लागणार ….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा