संघर्ष नात्यांचा
आकाशात उडणाऱ्या पाखरांची फसगत झाली … सूर्योदयाचा सूर्य चक्क उगवलाच नाही … उगवला तो काळोख ओवाळून टाकलेला विना ज्योतीचा … भयभित झाली पिल्ल , अचंबित पाखर कस घडल काय घडल ? घरटी कंपली संपली प्रेमछाया भयाण सृष्टीत ' हिरमुसली पहाटेची उष्टी आद्रता पक्षीभक्षकांच्या वाढल्या चाली पडल्या रक्ताच्या राशी प्रतिबिंबात दिसला तो फक्त आक्रोश बेसुऱ्या आनंदाचा … मग शोध सुरु झाला कारणांचा विश्वासघात कि बळजबरी का हा नाकर्तेपणा संबंधातला ? पाखर अडकली प्रश्नचिन्हात दडली इवल्याशा घरट्यात उमगल उत्तर जेव्हा वारा धावला सुर्य गेला होता . विश्रांतीला ढगांसोबत मैत्री जपण्यासाठी …. पण पाखरांच्या मायेच काय? ज्यांचा जीवनकोश सुरु होतो त्याच्याबरोबर आणि संपतोही त्याच्यासवेत त्यांचं नात इतक गौण कि रक्ताच्या पाकानेही न भराव मन खगयाच ? का त्याच्याच क्ष किरणांनीच आदू केलीय त्याची दृष्टी ? कि हरलाय पाखरांचा देवता समतोल राखण्यात ? संघर्ष नात्यातला नेहमीचाच एकाला हवीय जीवनभराची साथ तर दुसऱ्याच जीवनच घेत अनंताचा ध्यास एकाला हवय दुसऱ्याची बंदिस्त सावली...