संघर्ष नात्यांचा

आकाशात उडणाऱ्या पाखरांची फसगत झाली …
सूर्योदयाचा सूर्य चक्क उगवलाच नाही …
उगवला तो काळोख
ओवाळून टाकलेला
विना ज्योतीचा …

भयभित झाली पिल्ल ,
अचंबित पाखर
कस घडल काय घडल ?
घरटी कंपली
संपली प्रेमछाया
भयाण सृष्टीत '
हिरमुसली पहाटेची उष्टी आद्रता
पक्षीभक्षकांच्या वाढल्या चाली
पडल्या रक्ताच्या राशी
प्रतिबिंबात दिसला तो फक्त आक्रोश
बेसुऱ्या आनंदाचा …

मग शोध सुरु झाला कारणांचा
विश्वासघात कि बळजबरी
का हा नाकर्तेपणा संबंधातला ?
पाखर अडकली प्रश्नचिन्हात
दडली इवल्याशा घरट्यात
उमगल उत्तर
जेव्हा वारा धावला
सुर्य गेला होता .
विश्रांतीला ढगांसोबत
मैत्री जपण्यासाठी ….
पण पाखरांच्या मायेच काय?
ज्यांचा जीवनकोश सुरु होतो त्याच्याबरोबर
आणि  संपतोही त्याच्यासवेत
त्यांचं नात इतक गौण कि
रक्ताच्या पाकानेही न भराव मन खगयाच ?
का त्याच्याच क्ष किरणांनीच आदू केलीय त्याची दृष्टी ?
कि हरलाय पाखरांचा देवता समतोल राखण्यात ?

संघर्ष नात्यातला नेहमीचाच
एकाला हवीय जीवनभराची साथ
तर दुसऱ्याच जीवनच घेत अनंताचा ध्यास
एकाला हवय दुसऱ्याची बंदिस्त सावली
तर दुसऱ्याला हवीय मोकळी उघड्या माळरानाची

पण शेवटी पाखर मात्र वाट बघतात
उद्याच्या उदयाची…
कारण कुणासाठी कुणाचे अश्रू
स्वतःच्या रक्ताहुन मौल्यवान असतात


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती