पोस्ट्स

मे, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

@ 5th May, Karl Marx's Birthday

इमेज
असंख्य , बंदिस्त पाखरांना मुक्तीचा संदेश देणार्‍या त्यांच्या पंखांना सशस्त्र क्रांतीचे बळ देणार्‍या देवदूताने आज पहिला श्वास घेतला ह्या भिन्नतेच्या प्रदुषित समाजात , पण हे देवदूता , शेकडो वर्षे झाली , तरीही तुझा अग्रदूत आजही भुकेलेल्या कारखानदारांना , आसुसलेल्या सावकारांना स्वतःच्या मांसाचे लचके स्वतःच्याच नखाने ओरखडून दाखवतोय नैवेद्य घोषणांसह , अन् मोबदल्याच्या भिकेच्या भाकरावरच मायच तेराव उरकतो. चिरफाड करणार्‍या हाताचा रंगही हिरवा , विकासाचा , भरभराटीचा प्रतिक ! असला विकास कोणत्या सावरकर-आंबेडकर-गांधी-नेहरुंना अभिप्रेत होता कुणास ठाऊक ? आमिर खानच्या तात्विक , सुखद अंताच्या चलचित्रात रमणारा तुझा नेता , कधीच सुखावला नाही तुझ्या स्वप्नात , तुझ स्वप्न – संग्रह , वास्तवाच्या चलचित्रांचा , तुझ्या नजरेतला समाज कधी स्वप्नाळला नाही कोणीच . पाचवीला पुजलेल्या अन् हाता-गळ्यात अडकवलेल्या जातीच्या गंड्या-दोर्‍यांना सोडवलच नाही , मग वर्गसंघर्षांची पहिली पायरी दिसणार तर कशी ? कोसोदुर असलेल्या शोषितांच्या डबक्यांतच तुझा राजा गुंतलाय , तुझ materialistic diele...