@ 5th May, Karl Marx's Birthday
असंख्य, बंदिस्त पाखरांना मुक्तीचा
संदेश
देणार्या
त्यांच्या पंखांना सशस्त्र क्रांतीचे बळ देणार्या
देवदूताने आज पहिला श्वास घेतला
ह्या भिन्नतेच्या प्रदुषित समाजात,
पण हे देवदूता, शेकडो वर्षे झाली,
तरीही तुझा अग्रदूत आजही
भुकेलेल्या कारखानदारांना,
आसुसलेल्या सावकारांना
स्वतःच्या मांसाचे लचके
स्वतःच्याच नखाने ओरखडून
दाखवतोय नैवेद्य घोषणांसह,
अन् मोबदल्याच्या भिकेच्या भाकरावरच
मायच तेराव उरकतो.
चिरफाड करणार्या हाताचा रंगही हिरवा,
विकासाचा, भरभराटीचा प्रतिक !
असला विकास कोणत्या
सावरकर-आंबेडकर-गांधी-नेहरुंना
अभिप्रेत होता कुणास ठाऊक?
आमिर खानच्या तात्विक, सुखद अंताच्या
चलचित्रात रमणारा तुझा नेता,
कधीच सुखावला नाही तुझ्या स्वप्नात,
तुझ स्वप्न – संग्रह, वास्तवाच्या चलचित्रांचा,
तुझ्या नजरेतला समाज
कधी स्वप्नाळला नाही कोणीच.
पाचवीला पुजलेल्या अन् हाता-गळ्यात अडकवलेल्या
जातीच्या गंड्या-दोर्यांना सोडवलच नाही,
मग वर्गसंघर्षांची पहिली पायरी दिसणार तर कशी?
कोसोदुर असलेल्या शोषितांच्या डबक्यांतच
तुझा राजा गुंतलाय,
तुझ materialistic dielectric च तत्व
कधी येणार अस्तित्वात?
त्यातून सावरायला घेशील का पुन्हा जन्म?
माहितेय, नाही तुझा विश्वास ह्यावर,
पण तुझी तत्वे बदलण्याचा, कृतीत आणण्याचा
अधिकार तुझाच ना!
तत्वातूनच घे ना पुर्नजन्म,
कारण तुझ्या त्या नव्या श्वासाची
असंख्य, सजीव जीवश्म वाट बघताहेत
कारण ह्या आंधळ्या धृतराष्ट्राला
समाधान मानाव अस काहीच उरणार नाही,
पुन्हा एकदा !!!
देणार्या
त्यांच्या पंखांना सशस्त्र क्रांतीचे बळ देणार्या
देवदूताने आज पहिला श्वास घेतला
ह्या भिन्नतेच्या प्रदुषित समाजात,
पण हे देवदूता, शेकडो वर्षे झाली,
तरीही तुझा अग्रदूत आजही
भुकेलेल्या कारखानदारांना,
आसुसलेल्या सावकारांना
स्वतःच्या मांसाचे लचके
स्वतःच्याच नखाने ओरखडून
दाखवतोय नैवेद्य घोषणांसह,
अन् मोबदल्याच्या भिकेच्या भाकरावरच
मायच तेराव उरकतो.
चिरफाड करणार्या हाताचा रंगही हिरवा,
विकासाचा, भरभराटीचा प्रतिक !
असला विकास कोणत्या
सावरकर-आंबेडकर-गांधी-नेहरुंना
अभिप्रेत होता कुणास ठाऊक?
आमिर खानच्या तात्विक, सुखद अंताच्या
चलचित्रात रमणारा तुझा नेता,
कधीच सुखावला नाही तुझ्या स्वप्नात,
तुझ स्वप्न – संग्रह, वास्तवाच्या चलचित्रांचा,
तुझ्या नजरेतला समाज
कधी स्वप्नाळला नाही कोणीच.
पाचवीला पुजलेल्या अन् हाता-गळ्यात अडकवलेल्या
जातीच्या गंड्या-दोर्यांना सोडवलच नाही,
मग वर्गसंघर्षांची पहिली पायरी दिसणार तर कशी?
कोसोदुर असलेल्या शोषितांच्या डबक्यांतच
तुझा राजा गुंतलाय,
तुझ materialistic dielectric च तत्व
कधी येणार अस्तित्वात?
त्यातून सावरायला घेशील का पुन्हा जन्म?
माहितेय, नाही तुझा विश्वास ह्यावर,
पण तुझी तत्वे बदलण्याचा, कृतीत आणण्याचा
अधिकार तुझाच ना!
तत्वातूनच घे ना पुर्नजन्म,
कारण तुझ्या त्या नव्या श्वासाची
असंख्य, सजीव जीवश्म वाट बघताहेत
कारण ह्या आंधळ्या धृतराष्ट्राला
समाधान मानाव अस काहीच उरणार नाही,
पुन्हा एकदा !!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा