पोस्ट्स

जानेवारी, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मी जागा रहातो..

दिवसा कुठे तरी दडून बसलेली रात्र ह्यावेळी आकाशा येवढी मोठ्ठी होते एकटीच ‘ना सोयरे ना सुतक’ ह्या नियमाने तीनेही एकटेपण स्वीकारल असाव कदाचित ह्या इतक्या शांततेतही रातकिडे मात्र जिवंतपणाची आठवण करून देतात पण ते हसाताहेत की रडताहेत काहीच कळत नाही तरीही कळल्याचा आव आणून मीही कधी हसतो तर कधी रडतो अस म्हणतात रासायनिक प्रक्रियेने काजव्यांमध्ये प्रकाश तयार होतो रात्र फक्त एक निमित्त रासायनिक प्रक्रिया आमच्यातही होते पाणी पापण्यांपर्यंत नीरस असते ओघळताना खारे बनते दु:ख फक्त एक निमित्त पृथ्वी गोल आहे हे आता जाणवत रिकाम्या पहाटेबरोबर मग मलाही ‘शुन्यत्वाचा’ भास होतो तो भास नसल्याचा दिलासा पहाट करुन जाते मी मात्र रात्रीला काळोखाचा शाप आणि दिवसाला तेजाच वरदान ह्याशिवाय स्वार्गस्थ शक्तींना काहीच चमत्कार करता येत नाहीत अस मानून असाच जागा रहातो जशी रात्र रात्री जागी असते अगदी तसाच

चाहत

मोमबत्ती जल रही है पर उजाला खो गया अकेले में भी तन्हाईने भी तन्हा कर दिया जरासा टुट गया जरासा रुठ गया जोडने गये दिल जब हवाओं ने रुख बदला ना दवा है काम की ना दुवा है असरदार इश्क की बिमारी है और नफरत का है कारोबार बातो बातों मे एक बात निकली उसे समज मे आये तभी रात हो गयी रात मे बुज जाये ऐसी ये चिंगारी नही अंधेरे मे मिट जाये ऐसी ये आशिकी नही सुबह की प्रतिक्षा नही ओस की बुंदों की है चाहत रोशनी की नही अपनीही विरानगी की है