एक क्षण यावा अन दवबिंदूची वाफ न होता मुरावीत पानापानात असाच एक क्षण यावा विरघळून जाव माझपण तुझ्या नसानसात नको तो शोध मृगजळाच्या सौंदर्याचा हवाय फक्त तुझ्यातला माझा दर्या एक क्षण यावा अन सूर्यानेही द्यावे शीतल हास्य मिठागरांनाही यावी भरती असाच एक क्षण यावा, अश्रूंना मिळावा दिलासा तुझ्या कुशीचा ते निमित्त मुक्त कवडसांच्या मिलनाच दोघांच्या देहावर विसावलेल्या एक क्षण यावा अन सुर्यफुलाही सापडावा नवा पर्याय जगण्याचा तोडावा दोर खगयाच्या बंधनाचा असाच एक क्षण यावा, एकवटावा माझ्या जगण्याचा हेतू तुझ्या अस्तित्वावर, विसराव आत्म्याचं असण लपायला मिळाव त्याला तुझ्या हृदयाच आंगण एक क्षण यावा अन बाकीचे क्षण व्हावेत आनंदी करावा निसर्गाचा सत्कार अनंतासाठी याव चैतन्य भूतलावर असाच एक क्षण यावा माझे क्षण व्हावेत तुझे तुझे …… दीर्घायुषी! अन उतरावा जीव तुझ्या पेशींमध्ये,…