गोड रात्र

चांदण्या रात्री
काळ्या नभांखाली  
तिमिराची ओढणी बाजूला सारून
ओळखलस मला 
बघताच तुला 
ओवावी हृदयाची चादर 
लपवावं चंद्रदृष्टीपासून 

मी अचंबित, अगणित 
डोळे अबोल 
मनात खळबळ
सौंदर्य तुझ
शोषून घ्याव सर्वांगाने
थांबावी मग खळबळ
डोळ्यांनीही घ्यावा बोलकेपणा

तुझे स्वर पडता कानी 
थरथरल मन 
कम्पला जीव
विस्तीर्ण भूतलावरच्या
किडूक मिडूक जिंदगानीला
द्याव एक अभय पुर्नजन्मचा

तू घेता अलगद मिठीत
व्हावा साक्षात्कार सजीव असल्याचा
नवी उमेद ती जगण्याची
मिळावी याच वेळी तुझ्या कुशीत
मनाच वार्धक्य मिटाव
उगवाव नवांकुर
तुझ्या नावच ……


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती