पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ये

इमेज
पहाट  हरवलीय मुक्तीच्या पाखरांबरोबर , तुझ्यासवेत मी पाहतोय तुम्हाला जाताना वेडा वारा सैरभैर नाचताना उगवती रोपटी पाणावलीत भैरव गाताना दवबिंदूच अस्तित्वच मिटल विटल उत्साहाच रक्त पानांच्या देटात उरते निर्जीव रसायन फक्त रिकाम होत मनाच  हिरेजडीत तख्त मृगजळ दगा देतो दिसते आशेची विस्कटलेली माती आता अंधुकशी झालेली पहाटही हिरावून घेतेय गोड स्वप्न पहाटेची राहतो एकांत माथी नजरेला असतेच ना प्रतीक्षा येशील तू तिन्हीसांजेला  मग गातील रोपटी मारवा  अनुभवेल मन हेमंतचा गारवा भेटेल प्रेमाची मुक्ती दवबिंदू चकाकतील आकाशी भावी ऋणबंध उमटतील माथी यायचं असेल तर संध्याकाळीच ये ह्या डोळ्यांनाही घेऊ दे ना तुझ सुख कारण स्वप्न बघताना ते मिटातात आणि उघडतात तेव्हा … तू नसतेस

अदृश्य शक्ती

अखंड तपस्या से मिलता हु मै लोग कहते है , मै  हु लालची भक्ती पार हि देता हु हर चीज , होता हु क्रोधीत तो लेता हु जान  डरता है कोई तो कोई करता है स्वार्थ …. लेकिन मै तो हु  रोशनी अंधे कि  शुभवाणी मुख कि  चाहत खुशियो कि  मै  तो रहता हु सदा  फुलों के सुगंध मे, मधुमख्खि के शहद मे, हर एक सच्चाई मे ढूंढते है मुझे हर क्षण हर कण मे, अरे ढूंढो मुझे अपनी जिंदगी मे   मिलुंगा मै तुम्हारी उम्मीदों मे  ना करो हत्या किसी कि ना बाटो मुझको  मै तो सब का हु  और तुम सब मेरे …… 

घेऊन चल

इमेज
किती दिवस गहाण  ठेवणार आहेस अंधाऱ्या रात्रीकडे तुझ्याशिवाय रातराणीचा सुवास निर्जीव, गुदमरतो तुझ्या श्वासाविन जीवाचा जीव त्याला श्वास  देण्यासाठी तर घेऊन चल पुसटश्या चांद्रयप्रकाशावर उटते तुझ्या परछायेची नक्षी मग गातो मनातला पक्षी तुझी उष्टी गाणी माझ्यातली तू येतेस डोळे बंद करून घेऊन जातेस दूरदेशी आभास हे सत्यात आणण्यासाठी तर घेऊन चल तुझ्या विरहाची वटवाघुळे येतात मनाच्या उंबरठ्यावर आवाजाने त्यांच्या पाखरू प्रेमाचे बिथरते मग कुण्याकाळची वचने उमटतात ओठांवर त्यांना अर्थ देण्यासाठी तर घेऊन चल बघ पहाट आली पावलांपाशी जणु मरणच घेऊन आलीय अदृश्य मरण .. सरणाशिवाय जळत सर्वस्व उरत ते कटू सत्य वाटत यावीस तू अन मारावीस मिठी पहाटेच्या आधी कुशीत घेण्यासाठी तर घेऊन चल मलाही उगवता सूर्य बघायचा आहे पण तुझ्याबरोबर