घेऊन चल

किती दिवस गहाण  ठेवणार आहेस
अंधाऱ्या रात्रीकडे
तुझ्याशिवाय रातराणीचा सुवास
निर्जीव,
गुदमरतो तुझ्या श्वासाविन
जीवाचा जीव
त्याला श्वास  देण्यासाठी
तर घेऊन चल



पुसटश्या चांद्रयप्रकाशावर
उटते तुझ्या परछायेची नक्षी
मग गातो मनातला पक्षी
तुझी उष्टी गाणी
माझ्यातली तू येतेस
डोळे बंद करून
घेऊन जातेस
दूरदेशी
आभास हे सत्यात आणण्यासाठी
तर घेऊन चल

तुझ्या विरहाची वटवाघुळे
येतात मनाच्या उंबरठ्यावर
आवाजाने त्यांच्या
पाखरू प्रेमाचे बिथरते
मग कुण्याकाळची वचने
उमटतात ओठांवर
त्यांना अर्थ देण्यासाठी
तर घेऊन चल

बघ पहाट आली पावलांपाशी
जणु मरणच घेऊन आलीय
अदृश्य मरण ..
सरणाशिवाय जळत सर्वस्व
उरत ते कटू सत्य
वाटत यावीस तू
अन मारावीस मिठी
पहाटेच्या आधी
कुशीत घेण्यासाठी
तर घेऊन चल

मलाही उगवता सूर्य बघायचा आहे
पण तुझ्याबरोबर


  





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती