पोस्ट्स

फेब्रुवारी, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मराठी

इमेज
मराठी.. मुकुंदराजाने वाढवलेली, चक्रधरांनी शिकवलेली, ज्ञानेश्वरांनी पावन केलेली, शिवाजींनी गाजवलेली मराठी.... बहिणाबाईंची अशिक्षीत सुसंस्कृत बोली अन् तुकारामांची माणसाळलेली ओवी मराठी लाखोंनी जपलेली, अन् लाखोंना जगवणारी.. निःधर्मी, स्वाभिमानी,सर्वसमावेशक जीवनशैली.. पण... यादकालीन राजभाषा आज घेतेय कृत्रिम श्वास, होतेय नापुत्रिक.. अटकेपार जाणारी आज गुदमरतेय अटकेतच.. तिच अस्तित्व मराठी शाळेच्या काळ्या फळ्यावर दुकानांच्या पाट्यांवर अन् राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर.. पण भाषा कधीच नसते टाकाऊ, असेलच काही तर तो अभागी भाषक पुन्हा उगवेल,दौडेल मराठी.. सह्याद्रीच्या कुशीत गरजेल मराठी..... मराठीला माझा मानाचा मुजरा...

पुरोगामीत्व

इमेज
शाहूंच्या भूमीत पडलेला रक्ताचा सडा बघूनही कस घ्यायचं पुरोगामीत्वाच नाव ? विवेकाची फाटकी गोंधडी पांघरून किती दिवस आणायचा बुद्धिमत्तेचा आव? किती युगे करायची शोकांकीकतेची हाव? कफ़ल्लकतेची मर्यादा ओलांडणारे श्वास झालेत यतीम रक्ताळलेला देहही होतोय निर्मम गुलामगिरीवर समाधानी आहेत बहुसंख्य स्वतंत्र जीव, स्वतंत्र्याचा हावभाव करणारे, त्याची काम म्हणजे सडलेल्या फुलांची माळ शहिदांच्या तजबिरिसमोर ठेवायची अन अश्रू गाळायचे आणि तेवढंच केल तर उद्याचा कालिदास कौरवांची यशोगाथा लिहील विवेकाचा पराभव इतिहास म्हणून सांगितला जाईल स्वातंत्र्य म्हणजे सत्ताधीशांनी भिक म्हणून फेकलेली पोळी नाही, ते तर जन्माबरोबर आलेल जुळ आहे. त्याच्यासाठी विनवणीची नाही तर गरज आहे युद्धाची वैचारिक युद्धाची, म्हणूनच आता शोकाला काही अर्थ नाही लढणाऱ्याने फक्त लढायचं बुडायचं नाही कधी शोकात शहिदांना सलाम करून पुन्हा उतरायचं युद्धात आता या शस्त्रांच्या वाराला वैचारिक बाणाने उत्तर द्यावे लागेल कारण तो अमर आहे क्षणिकतेचा शाप तर हिंसकांना आहे... कॉम्रेड पानसरे, काळजी करु नका तुमचे विचार आम्ही नक्कीच पुढ...

शिवजयंती

इमेज
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर,बहुजनप्रतिपालक, महाराजाधिराज योगिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महाराज मुजरा असावा, आज सगळ्या ठिकाणी तुमचा जयजयकार असेल. खुप ठिकाणी मिरवणुकाही निघतील. प्रत्येकातला 'मर्द मराठा' आज जागा होईल. काहीजणांचा दुसर्‍या कोणत्यातरी तारखेला जागा होत असेल. असो, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त आजच का? कारण अहो राजे, आजचा हा तुमचा मावळा कुंभकर्णाचा अवतारच आहे. कुंभकर्ण निदान सहा महिने जागा तर होत होता प ण तुमचा मावळा अजुन निद्रावशेतच आहे.. जागा झालाच तर तो केवळ एका वितीच्या पोटासाठी..तेही भरतो तो गुलामगिरीने... आता तुम्ही म्हणाल की ह्या राज्यात कोणताच हिरा नाही का? अहो राजे तुमच्या माझ्या ह्या राज्यात जन्माला येणारा प्रत्येक जीव हा हिराच आहे. पण काहीजण स्वःतलाच ठिकर्‍या मारुन घेतात आणि बाकीचे कोणत्यातरी कोळसाच्या खाणीत सडत पडतात. पण उरलेले हातावर मोजणारे हिरे हे राज्य उजळुन टाकत आहेत. पण बोटावर मोजणारेच? विचारात पडलात ना राजे? इतका मोठ्ठा इतिहास असुनही तुमचा मवाळा उदासिन कसा काय? अहो राजे पण तुमचा खरा ...

Kashmir is not Palestine and India is also not Israel

इमेज
Before going to discuss on Palestinian and Naxalite, I would like to write on difference and similarity between Palestinian and Kashmiri militant. As we know that 39,145 sq miles area of Kashmir is under India’s control. 33,145 sq miles area of Kashmir is under Pakistan’s control while China has 14,500 sq miles under its control. India, Srinagar is capital and Muzaffarabad is capital in Pakistan.like other disputes the Kashmir dispute is also due to British. When British were leaving the India, they partitioned India into two countries – Pakistan (Muslim majority) and India (Remaining people special Hindu majority). But after independence there were some states which were autonomous. For example- Hyderabad Deccan, Jammu and Kashmir. They were fully independent to decide where to go (to join the Pakistan or remain in India or independent). But iron man of India, Saradar Vallabhbhai Patel and PM of India Jawaharlal Nehru used very strong action to resolve these state in India. But dur...