मराठी

मराठी..
मुकुंदराजाने वाढवलेली,
चक्रधरांनी शिकवलेली,
ज्ञानेश्वरांनी पावन केलेली,
शिवाजींनी गाजवलेली

मराठी....
बहिणाबाईंची अशिक्षीत सुसंस्कृत बोली
अन्
तुकारामांची माणसाळलेली ओवी

मराठी
लाखोंनी जपलेली,
अन्
लाखोंना जगवणारी..
निःधर्मी, स्वाभिमानी,सर्वसमावेशक
जीवनशैली..

पण...
यादकालीन राजभाषा
आज घेतेय कृत्रिम श्वास,
होतेय नापुत्रिक..
अटकेपार जाणारी आज
गुदमरतेय अटकेतच..
तिच अस्तित्व
मराठी शाळेच्या काळ्या फळ्यावर
दुकानांच्या पाट्यांवर
अन्
राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर..

पण भाषा कधीच नसते टाकाऊ,
असेलच काही तर तो अभागी भाषक
पुन्हा उगवेल,दौडेल मराठी..
सह्याद्रीच्या कुशीत गरजेल मराठी.....

मराठीला माझा मानाचा मुजरा...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती