पोस्ट्स

मार्च, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

India-Palestine

इमेज
Now I am finally going to discuss the relation between India and Palestine. The relationship between India and Palestine are originated from independence of India from British rule. 10 million $ relief is provided to Palestine by India. 1st direct relationship is established in 1974 but it is recognized in 1988. India was 1st non Arab country who support Palestine. Although there is huge increase in bilateral trade in Indo - Israel trade, India will vote for Palestine in U.N. In Vajpayee's government, Israeli Prime Minister Ariel Sharon visited to India but then also there is no change in India's view. In UPA government, the relation of Israel and India forced to change the India's view about Palestine but then also there is no change. Now Israel government sent their diplomats to India to convince. But Modi government is not interested in that issue because India is known for supportive nation for the nations who struggle for independence. So India always support Palestin...

काळ

काळाच्या त्सुनामीत वाहून गेलेल्या झाडांची वाट बघतोय वाचलेली लव्हाळे आता उंच गगनाला भिडलेत ह्या सरत्या क्षणांनी सरणावरच नेऊन ठेवलाय स्वतःला अन मला सुद्धा फाटक्या आभाळाच्या गवाक्ष्यातून येणारा प्रकाश दररोज आठवण करून देतोय भूतकाळातील ओसांडलेल्या ढगफुटीची अन उतू गेलेल्या भरतीची वाकळदोऱ्याने शिवलेल्या जखमा दुर्मिळ झालेली संजीवनी शोधताहेत आजच्या पाण्याची एकतर वाफ होतेय नाही तर होतोय बर्फ पण जगण्याला ते  खळखळणार जीवनच हव आभाळाच्या गवाक्ष्याला पाहिजे भिरभिरणार थव नव्या दन्तमजणाबरोबर जुनी कडूनिंबची काडीही घ्यायचीय कृत्रिम आनंदाला खर हास्य तर मिळेल ….   

विभक्ती

आदिम काळापासून असंख्य जन्म घेतला हा आत्मा असाच विवस्त्र सर्पासारखा विव्हळत असेल कधी कबरीवर तर कधी चितेवर साम्य इतकच कि प्रत्येक क्षणी विषाची पिशवी अडकलेली असेल गळ्यात कोणी जमिनीत गाडला असेल तर कोणी राख केली असेल पण दररोज होणाऱ्या मरणाच काय? कोण करणार त्याच अस्तिविसर्जन कोण करणार दफन ? असंख्य आसवांची सलामी देऊनही रीती उरतात जमिनीतली चरे पण फिकिर कोणाला त्याची ? पोपटाने उचललेल्या पत्त्याला विधिलिखित सत्य मानणारे आज 'मार्गदर्शन' करताहेत मुक्तीचे मग हाती आलेल्या स्वप्नांच्या चिंद्या दिसतात प्रेतवस्त्रासम कफल्लक झालेल्या स्वप्निलकिरणांना सांत्वन करण्याखेरीज कायच नाही राहत त्या संत्वानाने मर्यादा घातल्यात त्याच्यावर ते तर माझ्या निष्क्रियतेच प्रतिक! आलेल्या हुंदक्याला अन सुटलेल्या उच्छश्वासाला थांबवू नाही शकत पण ह्या विभक्तीच्या ठसक्याचा धसकाच घेतलाय तरीही मनाला लागलेली कीड आता जाणार नाही पोकरून काढलाय तनयाचा अंशन अंश पोकरलेल्या तनयाला सध्या विश्रांती हवीय सरणावरही चालेल अन भूमीच्या पोटातही पण जगायचंय त्यालाही निदान पौर्णिमेपर्यंत कारण चंद्र कितीही रागाव...

पाऊस

इमेज
आज पाऊस पडला.. आजारपणातही जीव मेघगर्जनेत चिंब भिजला आठवणीचा झरा पुन्हा ओसांडला.. आणि आठवणीत तू नसशील तर आठवणीची व्याख्याच चुकीची ना? चर्‍हट्याने बांधलेल्या मनाला मग मी मोकळ केल  भेगाळलेल्या पावलांना वेडावलेल मन दूर दूर घेवून गेल प्रत्येक आठवणीतली तुझी प्रतिमा संजीवनीच, माझ्या मुडदूसावलेल्या देहासाठी तुझा स्पर्शाच्या जाणीवेने शहाराच आणला विरहाच्या प्रस्थापित दुःखाला धक्काच बसला.. त्याच्या जखमांवर मलमपट्टी करणच सोडलंय तुझ्याबरोबरचे क्षणच खपली बनतात पाऊसाच्या वाढत्या वेगाबरोबर मन बागडल बेफाम गुलमोहराच्या रंगात रंगल ज्याला पाठ टेकून आपण रंगवायचो स्वप्न अन ज्या तलावाकाठी आपण हरवायचो एकमेकांत त्यात डुपक्या लावल्या असंख्य मग शेवटी वरुणराजा थकला.. नाचणाऱ्या मोर बरोबर मनही शांत झाल आता पुन्हा तोच विरह तोच एकटेपणा पण विरह हा तर प्रेमाचा सांकेतिक शब्द! हा शब्द नीट पार करूया ह्याला वाटणी नाही त्याला आठवणीची जोडणी देऊया …. प्रेम हे मिळणारच …. अश्वस्थामाबरोबर अमर असलेली दुसरी गोष्ट म्हणजे प्रेम त्याला तो शाप आहे आणि प्रेमाला … वरदान