काळ

काळाच्या त्सुनामीत वाहून गेलेल्या झाडांची
वाट बघतोय
वाचलेली लव्हाळे आता उंच गगनाला भिडलेत
ह्या सरत्या क्षणांनी सरणावरच नेऊन ठेवलाय स्वतःला
अन मला सुद्धा
फाटक्या आभाळाच्या गवाक्ष्यातून येणारा
प्रकाश दररोज आठवण करून देतोय
भूतकाळातील ओसांडलेल्या ढगफुटीची
अन उतू गेलेल्या भरतीची
वाकळदोऱ्याने शिवलेल्या जखमा
दुर्मिळ झालेली संजीवनी शोधताहेत
आजच्या पाण्याची एकतर वाफ होतेय नाही तर होतोय बर्फ
पण जगण्याला ते  खळखळणार जीवनच हव
आभाळाच्या गवाक्ष्याला पाहिजे भिरभिरणार थव
नव्या दन्तमजणाबरोबर जुनी कडूनिंबची काडीही घ्यायचीय
कृत्रिम आनंदाला खर हास्य तर मिळेल ….
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती