विभक्ती

आदिम काळापासून असंख्य जन्म घेतला हा आत्मा
असाच विवस्त्र सर्पासारखा विव्हळत असेल कधी कबरीवर तर कधी चितेवर
साम्य इतकच कि प्रत्येक क्षणी विषाची पिशवी अडकलेली असेल गळ्यात
कोणी जमिनीत गाडला असेल तर कोणी राख केली असेल
पण दररोज होणाऱ्या मरणाच काय?
कोण करणार त्याच अस्तिविसर्जन
कोण करणार दफन ?

असंख्य आसवांची सलामी देऊनही रीती उरतात जमिनीतली चरे
पण फिकिर कोणाला त्याची ?
पोपटाने उचललेल्या पत्त्याला विधिलिखित सत्य मानणारे
आज 'मार्गदर्शन' करताहेत मुक्तीचे
मग हाती आलेल्या स्वप्नांच्या चिंद्या दिसतात प्रेतवस्त्रासम
कफल्लक झालेल्या स्वप्निलकिरणांना
सांत्वन करण्याखेरीज कायच नाही राहत
त्या संत्वानाने मर्यादा घातल्यात त्याच्यावर
ते तर माझ्या निष्क्रियतेच प्रतिक!

आलेल्या हुंदक्याला अन सुटलेल्या उच्छश्वासाला थांबवू नाही शकत
पण ह्या विभक्तीच्या ठसक्याचा
धसकाच घेतलाय
तरीही मनाला लागलेली कीड
आता जाणार नाही
पोकरून काढलाय तनयाचा अंशन अंश
पोकरलेल्या तनयाला
सध्या विश्रांती हवीय
सरणावरही चालेल अन भूमीच्या पोटातही
पण जगायचंय त्यालाही
निदान पौर्णिमेपर्यंत
कारण चंद्र कितीही रागावला
तरीही पौर्णिमेला दर्शन देतोच ……

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती