हिजड्यांच्या गावात हरवलोय...

हिजड्यांच्या गावात हरवलोय...
पुर्ण लिंगाच्या पुरषी आखाड्यात
भरणार्‍या लाखो कुस्त्याचा प्रेक्षक होता होता
रस्ता चुकलोय...

इथ पोट भरायला
अपुरे आहेत भाकराचे तुकडे,
मर्दानीला तोंडी लागतात चुरगळणारे लचके
बाजारही भरतो तो उपासमारीच्या गांध्यांना खाजवणार्‍या,
वासनेच्या साखळदंडाने जखडलेल्या 'भोगवस्तुंचा'
त्यांच्या किंचाळण्याला आवाजच नाही
चामड्याला वेदना अन् देहाला किंमत
काहीच नाही...

घरात, घराबाहेर, धर्मस्थळांत, धर्मस्थळाबाहेर,
शाळेत, शाळेबाहेर, खाजगीजागेवर, सार्वजणिक रानात
उडताहेत फवारे अर्धमेल्या विर्याचे
कितीही नमन करा आर्याचे
जळीतकांड होणारच
'भोगवस्तुची' राख होणारच
रक्षाविसर्जनही होत ते दलालांच्या दलदलितच...

माडींत लिंग कुजवणार्‍या हिजड्यांच्या गावात हरवलोय...
मिशीवर ताव मारणार्‍या शण्डाच्या वस्तीत हरवलोय...
माझ पुरुषत्व संपण्याच्या आधी,
ह्या हिजड्यांसारखा शण्ड होण्याआधी
नव गाव दिसु दे...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती