माझ जग
का गुरफटून गेलय मन
प्रश्न - उत्तरात ?
का तोडत नाही आम्ही
प्रश्नचिंन्हांचे कुंपण ?
आम्ही झालोय स्वार्थी
मेंदूलाच बनवलय सारथी
अनोळख्या मार्गावर जायला
आता भीतोय आम्ही ,
आम्हीच बनवलय आमच्या
नावाला अनामिक ….
पण पाडल्यात आता मी
परंपरागत भिंती
अन मुक्त झालोय मनाच्या पंखाबरोबर
तेव्हा कळल की ,
अरे , रात्र - दिवस , चंद्र - सूर्य
हे तर आभासच आहेत मनाचे
पण ….
याचा अर्थ मी जगत होतो
आभासी जीवन ?
म्हणजे माझी बुद्धीच
फसवत होती मला ?
पण आता नाही ….
आता जगतोय मी मनासारखे
मी ठरवलं तर उगवेल चंद्रही पहाटे ….
…. फक्त माझ्या खऱ्या जगात !
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा