अस्तित्व

अस्तित्व एक विराण
वास्तु बनलय
तिला प्रत्येक किरणांना रोखणार्‍या
खदकांनी वेढा घातलाय...

पहार्‍याची गरजच नाही
इथे सजीवतेचा अंशच नाही
आहे तो फक्त पुर्वजांचा बेनाम वावर
ह्या वास्तुला भय नाही
सुरकुत्यांचभेगांच
भीती तर त्या काळ्याकोठडीतल्या
काळकिड्यांची वाटतेय
एकटेपणावर टोच्या मारणार्‍या

जिथे नगाडे वाजायचे
तिथे किरकिरतेय रात्र दिवसाही
दिपस्तंभाची जागा आता
तिमिराच्या वटवाघळांनी घेतलीय
काजवांनाही आहे शाप त्याचा
ह्या वास्तवाच्याकाळाशार रंगमंचावर
अभिनय करता करता
रंगीत स्वप्न बघण विसरलोय

आता ही वास्तु सोड्ण्याशिवाय
पर्यायच नाही ....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती