यई ओ विठ्ठले

मध्यंतरी विदर्भातील काही गावांच्या अभ्यासाठी मी गेलेलो.. तेव्हा मी जी परिस्थीती बघितली तेव्हा काहीतरी सुचलेल त्यावेळी ज्या ओळी लिहुन ठेवल्या होत्या त्या आता इथे पोस्ट करीत आहे. (सुट्टीचा आणि परिक्षा नसल्याचा हा एक फायदा)..

यई ओ विठ्ठले माझे माऊली ये
नयनी जीव आणुनी वाट मी पाहे

धरणीच्या ह्या भेगा शोधी तुझे रुप
कोरड्या पोटी करतो विठ्ठलनामाचा जाप

पिवळा पितांबर आता गगनी कोपला
आसुडवारी करूनी जिव तुझ्या दारी आला

खोटोबांचे राज्य आम्हा रस्त्यावर जाळी
दलालांचे दास आता कोणी नाही वाली

पाहूणी आक्रोश आमचा तू का गप्प झाला
कृपादृष्टी शोधे आम्ही तुझीया पंढरीराया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Atheist having spiritual experience

माझ जग

Day one...