सनातन, अनादी प्रेम

हजारो वर्षांपुर्वीच्या सुसंस्कृत संस्कृतींनी,
मानवी वसाहतींनीही बघितलाय अंत
त्यांचेही असतील देव धर्म अन् ग्रंथ
ते मिटले तर मग आम्ही कसले सनातन
अन् कसले अनादी?
आम्ही तर झुलणार्‍या पाळण्यापासुनच्या
जळत्या चितेपर्यंतच्या यात्रेतले अल्पजीवी.
हो अल्पजिवीच
कारण वैचारिक स्वातंत्र कधीच मरतय
उरतय ते पाच-सहा फूटाच गुदमरणार शरीर
आणि त्याच्या भोवतालची झगमगीत वलय

संकुचित पुराव्यांनी सर्वांग इतक मलिन केलय
की मानवताच दिसेनाशी झालीय..
केवळ हालचाल करतो म्हणुन सजीव
अन् बोलतो म्हणून मानव!
अश्या आवतारातला हा मानव
आज पुजतोय अदृश्य अपप्रवृतींना.
त्याच हे अनभिज्ञत्व, अंधत्व
त्याच्या गृहीतांची प्रतिमाच जणु!

प्रश्न अस्तिकतेचा नाही ना नस्तिकतेचा
प्रश्न आहे तो स्वःताच्या अस्तित्वाचा
जन्मापासून आलेल हे दासत्व
पंगु करतय नवदृष्टी
ती पंगु नवदृष्टी,
हुंदक्याला आक्रोशाला
दाद देणारी बुद्धी
यांच्या मिलनातुन होणार तिरस्कारच
करतोय कालवश सृष्टीच्या अस्तित्वाला.


नकोयत ती तिरस्कार शिकवणारी गृहीते,
नकोयत त्यांच्या प्रतिमा,
त्या मागच्या भावना
हवय ते फक्त प्रेम,
प्रेमाच्या असंख्य छटांनी कोरलेली
सुजान छायाचित्र हवीत.
त्यातुनच येईल दुसर्‍याच्या नखशिखांत स्वातंत्र्याची दया…

कोणताच विरुद्धार्थी शब्द नाही प्रेमाला
ते तर उगमस्थान आहे
सर्वात सुंदर वास्तुचे, कृतीचे, जीवाचे
तिरस्कारही उगमस्थान आहे
पण विदारक, विद्वंसक विनाशाचे…

ह्या नाशवंत विश्वात
सनातन, अनादी काही असेल तर ते फक्त प्रेम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

क्रांती

Atheist having spiritual experience