पोस्ट्स

तेरा साथ

इमेज
निले गगन के नीचे तुझे देखा , तो दिल करता है  कि दिल किहि चद्दर को तेरा घुंगट बनादु छुपालु  पागल सुरज से कुचही पल गये फिर भी लगता है कई साल हुये तुझे देख के चेहरे कि मुस्कान अभीभी मरम्मत करता  है बिछडने के दर्द कि पर ये खुदा डाल दे जहान्नम पर, मना मत कर इस महोब्बत को, अब ना डारा इस  मौत से क्यू की इस प्यार मैं तो उसकी  आदतसी हो गयी है

गोड रात्र

इमेज
चांदण्या रात्री काळ्या नभांखाली   तिमिराची ओढणी बाजूला सारून ओळखलस मला  बघताच तुला  ओवावी हृदयाची चादर  लपवावं चंद्रदृष्टीपासून  मी अचंबित, अगणित  डोळे अबोल  मनात खळबळ सौंदर्य तुझ शोषून घ्याव सर्वांगाने थांबावी मग खळबळ डोळ्यांनीही घ्यावा बोलकेपणा तुझे स्वर पडता कानी  थरथरल मन  कम्पला जीव विस्तीर्ण भूतलावरच्या किडूक मिडूक जिंदगानीला द्याव एक अभय पुर्नजन्मचा तू घेता अलगद मिठीत व्हावा साक्षात्कार सजीव असल्याचा नवी उमेद ती जगण्याची मिळावी याच वेळी तुझ्या कुशीत मनाच वार्धक्य मिटाव उगवाव नवांकुर तुझ्या नावच ……

आठवण तुझ्या क्षणांची

इमेज
एक क्षण यावा अन दवबिंदूची वाफ न होता मुरावीत पानापानात असाच एक क्षण यावा विरघळून जाव माझपण तुझ्या नसानसात नको तो शोध मृगजळाच्या सौंदर्याचा हवाय फक्त तुझ्यातला माझा दर्या एक क्षण यावा अन सूर्यानेही द्यावे शीतल हास्य मिठागरांनाही यावी भरती असाच एक क्षण यावा, अश्रूंना मिळावा दिलासा तुझ्या कुशीचा ते निमित्त मुक्त कवडसांच्या मिलनाच दोघांच्या देहावर विसावलेल्या एक क्षण यावा अन सुर्यफुलाही सापडावा नवा पर्याय जगण्याचा तोडावा दोर खगयाच्या बंधनाचा असाच एक क्षण यावा, एकवटावा माझ्या जगण्याचा हेतू तुझ्या अस्तित्वावर, विसराव आत्म्याचं असण लपायला मिळाव त्याला तुझ्या हृदयाच आंगण एक क्षण यावा अन बाकीचे क्षण व्हावेत आनंदी करावा निसर्गाचा सत्कार अनंतासाठी याव चैतन्य भूतलावर असाच एक क्षण यावा माझे क्षण व्हावेत तुझे तुझे ……  दीर्घायुषी! अन उतरावा जीव तुझ्या पेशींमध्ये,…

भास

ती भासे मज विद्युलता, नकट्या सरी बरसती लाली बनुन रही ती त्यांच्या मस्तिश्कावरी. मी सुनवतो तमाला “अरे हीच ती नयनदृष्टी, ... आदित्याविस्कार, तुला पुरुन उरे.” ती भासे मज मंद ज्योत रणरागिणी विजयचि प्रेरणा उत्सहाचि मी विनवतो देवाला, “तुजे नि माजे चित्त न गमते तिच्यापरि... तरि का जिव दोघांचा ही तिच्याविन तग धरी?” ती भासे मज अनंताची वाहिनी सागराचा उगम वत्सल्यच आंगण मज न उमजे ती परि तिस जानवे अंतरिचे भाव मी ठणकावे स्वःतालच, “तू याचना ती दिलासा तू घृणा ती माया तू एकरंगी आकाश ती सप्तरंगी इंद्रधनुष.” अंति खरे सत्य हे, मृत्यु न उरे जन्मापरि मी नसे माझा ... तिच्यापरि...

घर

इमेज
घर.... एक स्वप्न घाम गाळणाय्रांसाठी , रक्ताचे शिंतोडे उडवणाय्रांसाठी … जीवनची इंद्रीये विकून , उरलीसुरली अवयवे भाड्याने देऊन वसवलेल स्वतःच घर जणु कबीरची नगरीचं.... शेवटी स्वप्नांना आशेचा किरण भेटतो … स्वप्न सत्यात उतरलली दिसतात पण..... शेवटी तोच क्ष-किरण बनून स्वप्नांना छेदून दूर अनंतात जातो कोणत्याही अडथ्ळ्यशिवाय..... अन् इमारत कोसळ्ते..... त्यांच्या अस्तित्वाचा साधा पुरावही उरत नाही , उरतो तो कोंद्ट घोषणांचा उच्छाद ,,,, आमच्याकडे असतो तो एक शोकांकित श्वास , सांत्वनात गुंतलेल मन , एका मिनिटच्या विनोदनं स्थिरस्थावर होणार... अन् ज्यांच्याकडे काही नसत , त्यांच मन हिजड झालेल असत..

निरोप

इमेज
निरोप  आता बघवत नाही रे  निरोप घेण - देण , सहनही होत नाही  पण तरीही हसतोय  तुझ्या समाधनासाठी  मिठागरे गच्च भरलीत  डोळ्यातली  पिकल पान गळाव , तसच गळतय पाणी  त्या मिठागरातून आता आवरताही  येईना  त्याच्या फुटलेल्या बांधाला  आता जीवन अमावस्याच  बनून राहिलंय बघ  लाखो\चांदण्या असूनही  चंद्रच हरवून बसलोय  आता चालतानापण एक पाऊल  कमी होणार , लंगड्यासारख  रहाव लागणार , शब्दांना अर्थाशिवाय , अर्थांना भावनांशिवाय  रहाव लागणार , अन खऱ्या अर्थाने मलापण ' महाकाव्याशिवाय ' रहाव लागणार …. 

फुलपाखरु

इमेज
                                 फुलपाखरू आता खरच फुलपाखर दिसेनात , का भिरभिरत नाहीत फुलपाखर ? गमावलीय का त्यांनी पंखातली शक्ती ? का दडपण आहे त्यांच्यावर गरुडाभरारीच ? म्हणुनच सोडल असेल त्यांनी  भिरभिरण , अन सुरु केल असेल त्यांनी भटकण ….   आता खरच फुलपाखर दिसेनात , धुरकटलेल्या , शिस्तीच्या जगात  त्यांनच ते वेड्यागत उडण काय कामच ? ह्या जगाला हवीय झेप  गगनाला छेदणारी ,  कोणालाच नकोय मधाची मिठास ….  ह्या बेचव जगात  आता खरच फुलपाखर दिसेनात ….