फुलपाखरु
फुलपाखरू
आता खरच फुलपाखर दिसेनात ,का भिरभिरत नाहीत फुलपाखर ?
गमावलीय का त्यांनी पंखातली शक्ती ?
का दडपण आहे त्यांच्यावर गरुडाभरारीच ?
म्हणुनच सोडल असेल त्यांनी भिरभिरण ,
अन सुरु केल असेल त्यांनी भटकण ….
आता खरच फुलपाखर दिसेनात ,
धुरकटलेल्या , शिस्तीच्या जगात
ह्या जगाला हवीय झेप
गगनाला छेदणारी ,
कोणालाच नकोय मधाची मिठास ….
ह्या बेचव जगात आता खरच फुलपाखर दिसेनात ….

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा