ये
पहाट हरवलीय मुक्तीच्या पाखरांबरोबर , तुझ्यासवेत मी पाहतोय तुम्हाला जाताना वेडा वारा सैरभैर नाचताना उगवती रोपटी पाणावलीत भैरव गाताना दवबिंदूच अस्तित्वच मिटल विटल उत्साहाच रक्त पानांच्या देटात उरते निर्जीव रसायन फक्त रिकाम होत मनाच हिरेजडीत तख्त मृगजळ दगा देतो दिसते आशेची विस्कटलेली माती आता अंधुकशी झालेली पहाटही हिरावून घेतेय गोड स्वप्न पहाटेची राहतो एकांत माथी नजरेला असतेच ना प्रतीक्षा येशील तू तिन्हीसांजेला मग गातील रोपटी मारवा अनुभवेल मन हेमंतचा गारवा भेटेल प्रेमाची मुक्ती दवबिंदू चकाकतील आकाशी भावी ऋणबंध उमटतील माथी यायचं असेल तर संध्याकाळीच ये ह्या डोळ्यांनाही घेऊ दे ना तुझ सुख कारण स्वप्न बघताना ते मिटातात आणि उघडतात तेव्हा … तू नसतेस