आबा, खरच धन्यवाद

काही गोष्टी ह्या स्मृती-विस्मृती च्या पलीकडच्या असतात… मग त्या आवडीच्या असोत-नसोत, तुम्ही त्या गोष्टी बरोबर सहमत असोत वा नसोत, त्यांच्या नसण्यान तुमच्या अपेक्षा, तुमची स्वप्न ही क्षणार्थात माती मोल वाटतात. असच काहीस झालय.


आबा अहो बघता बघता एक वर्ष झाल. तुम्ही दिसलाच नाहीत. खूप शोधल आबा तुम्हाला. पार मंत्रालयापासून ते विधानभवनापर्यंत. शेवटी तासगाव ला गेलो तेव्हा हिरव्यागार द्राक्ष बागात दिसलात तुम्ही. म्हैसाळ, टेंभू, ताकारी, आरफळच्या पाण्यात, तंटामुक्ती मुळे शांत झालेल्या गावच्या मातीत भेटलात. बोलण तेवढ राहून गेल बघा. तस जास्त काही नाही, फक्त आभार मानायचे होते, ह्या सगळ्या गोंधळात तुम्ही फक्त टीकाच ऐकल्याअसतील पण आज खरच आभार मानायचं. कधी कधी कस होत ना आबा वेळ खूपच लवकर निघून जातो, मग आम्हाला वाटत की आपण खूपच मागे राहिलोय, मग आम्ही प्रयत्न न करता नुसत कोसत बसतो नशिबाला, पण तुम्ही वेळेलाच मग टाकल, अगदी सर्व बाबतीत...कधी तुम्ही काळाबरोबरची शर्यत जिंकलात आणि काळाआड गुडूप झालात कळलच नाही.   
पण तुमच अस्तित्व अजून जाणवतय जागोजागी. आणि ती जाणीवच नवीन उत्साह आणत आहे. त्याच्यातूनच निर्माण होईल समाजशीलता…
आबा, खरच धन्यवाद. ह्या साऱ्या प्रयत्नांसाठी… 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती