स्वातंत्र
मी एक सर्वसामान्य विद्यार्थी.. खर तर मी खाजगी महाविद्यालयात शिकत आहे. त्यामुळे मला किती अधिकार आहे, ह्यावर बोलण्याचा हे मला खरच माहित नाही..
पण काल जे झाल त्यानंतर मात्र मी मौन सोडण्याच ठरवल. कारण त्या मौनालाही आता छिद्र पडुन ओरडावस वाटतय. मी साम्यवाद मार्क्सवादाने जरी प्रभावित झालो असलो तरी मी नेहमी भाजपा आणि संघाला विरोध करणारा अंधाळा युवा नाही.
जगातल्या सगळ्यात मोठ्ठ्या लोकशाहीचा सगळ्यात मोठ्ठा घटक असलेला शेतकरी आज मरत आहे. त्याच लोकशाहीत महिला आजही सनातनी जुनाट विचारांविरुद्ध संघर्ष करत आहेत. आणि आता त्याच लोकशाहीचा आधारस्तंभ युवा विद्यार्थी लढत आहे मारला जात आहे अन् मरतही आहेत.. मग ही कसली लोकशाही? आता तर त्याच लोकशाहीत त्या आधारस्तंभाचा आवाज दाबला जातोय.. आता अन्यायाविरुद्ध बोलायचही स्वातंत्र नाही का? का आता जगण्याचीपण भिक मागावी लागेल?
ह्या लोकशाही महिना पाच-सहा हजार रुपये कमवणार्या कामगाराच्या मुलाला उच्चशिक्षणाला वर्षाला लाख-लाख रुपये देण कस परवडेल? का त्या कामगाराला मुलगा उच्चशिक्षीत करण्याच स्वप्न बघण्याच स्वातंत्र नाही का?
मला सन्मानान जगण्याच स्वातंत्र हवय.. मला हवय अन्यायाविरुद्ध लढण्याच स्वातंत्र.. मी पण देशप्रेमी आहे. मी ना ह्या देशापासून स्वातंत्र मागत आहे ना देशाचे तुकडे पाडण्याच स्वातंत्र मागत आहे मी तर फक्त ह्या देशवासीयांना सन्मानपुर्वक जगण्याच,जगवण्याच स्वातंत्र मागत आहे.. मी मागत आहे स्वातंत्र त्या मरणार्या शेतकर्याच धडधडत्या भविष्याच.. मी मागत आहे स्वातंत्र त्या महिलांच्या सन्मानाच.. मी मागत आहे स्वातंत्र त्या कामगारच स्वप्न बघण्याच.. आणि मी मागत आहे विद्यार्थ्यांच्या लढण्याच स्वातंत्र ...
आणि हे मागण मागण्याच स्वातंत्र हवय मला.. मी आता मगतोय पण हिसकावून घेणही जानतो मी, पण मी भित्रा आहे, कमजोर आहे.. मी ना पोलिसांच्या लाठ्यांचा सामना करू शकत ना त्यांना प्रतिउत्तर देऊ शकत.. पण माझी लेखणी हीच माझ शस्त्र आहे.. मी इतक तर नक्कीच करू शकतो..
थोड्याशा संभ्रमात होतो.. शेवट कोणत्या घोषणेने करायचा ते कळत नव्हत. कारण आमची संकुचित मन त्यावरुनही भावनांचा वेगवेगळा अर्थ काढतात मग म्हणल राहु देत त्या घोषणाच...
विवेक जाधव
आइसा

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा