साम्यवाद!! भारतीय साम्यवाद...

मला खुप लोक मोजकेच पण एकसारखे सामान प्रश्न विचारतात. पहिला तो असा की तुम्ही साम्यावादी इतके बुरसटलेले बंदिस्त आणि विचाराबाबतीत संकुचित म्हणजेच न बदलणारे का असता?
त्याच उत्तर अस आहे की खर तर एका विशिष्ट विचाराने बांधुन घेण कोणालाच आवडत नाही, मलाही नाही आवडत. जर विचारवादी म्हणजे एका विशिष्ट विचाराला थांबवुन स्थिर रहाणारा असा असेल तर मग मी साम्यवादी नाही. मग अश्या व्याख्येने लेनिन,फिडेल, जॉग-इल, ज्योति बसु हे कोणीच साम्यवादी नाहीत. कारण ते कधीच विचाराला चिटकून नाही राहिले. त्यांनी त्यांच्यापरीने ह्या विचाराला नवा आकार देण्याचा प्रयत्न केला आणि कार्ल मार्क्सच म्हणला होता की, "हुश्श्श मी मार्क्सवादी नाही!" तो खुणवतोय सर्वांनाच की हा विचारप्रवाह थांबवुन देवु नका.. प्रवाहित ठेवा कारण हा इतर विचारप्रवाहासारखा फक्त राजकीय किंवा सामजिक विचार नाही तर तो 'वैज्ञानिक विचार' आहे.. आणि विज्ञान हे नेहमी प्रवाही असत. म्हणुन साम्यवादी म्हणजे साम्यवादाला प्रवाही ठेवणारा एक विचारवंत, कार्यकर्ता (काहीही म्हणा), पण 'साम्यवादाचा गुलाम' नव्हे... ह्या व्याख्येने मी पण साम्यवादी आहे.. त्यामुळे ह्या प्रश्नातली साम्यावादाची व्याख्या प्रश्न विचारणर्‍याने थोडीशी बदलण्याची गरज आहे....
दुसरा प्रश्न असा की तुम्ही खुप हिंसक असता.. तुम्ही एकाधीकारशाहीला मानता त्यामुळे हा विचार भारतात कसा रुजू होईल?
तर ह्या उत्तर देताना थोडासा इतिहास जाणुन घ्यावा लागेल.. प्रश्न विचारणार्‍याची दृष्टी केवळ मोजक्याच साम्यवादी नेत्यांवर (स्टेलिन, पोल पोट...) गेली असावी... पण जर लेनिनची भाषण ऐकली तर कळेल की लेनिनचा लोकशाहीवर विश्वास होता किंबहुना निष्ठा (डोळस निष्ठा) होती. म्हणुनच त्याने नोकरशाहीला विरोध केला होता कारण नोकरशाही ही कधीच लोकनियुक्त नसते. क्युबामध्ये हिंसाचार झाला कारण त्याला पर्याय नव्हता... आणि ज्योति बसुंकडे किंवा नम्बूदिरीपद (ज्यांनी जगातल पहिल लोकनियुक्त साम्यवादी सरकार चालवल) ह्यांच्याकडे बघितल तर तुम्हाला लोकशाहीतला साम्यवाद कळेल.. हे दोन नेते हुकुमशहा होते का? नाही ना.. जिथ हिंसाचार झाला तिथ परिस्थितीच तशी होती... आणि एकाधिकारशाही बद्दल बोलायच तर त्या त्या वेळी लोकशाही ही तितकीशी रुजली नव्हती, माणसाळलेली नव्हती. लोकांचाच लोकशाहीवर विश्वास नव्हता. मग पुढचा प्रश्न येतो की मग मार्क्स तर म्हणला होता की कामगाराच एकाधिकारशाही सरकार स्थापित ह्यायला हव. पहिली गोष्ट अशी की मार्क्स स्व:ता म्हणला होता की, "लोकशाही हा साम्यवादाची ध्येयपुर्ती करण्याचा एकमेव मार्ग आहे." दुसरी गोष्ट अशी की कामगारांच्या एकाधिकारशाही सरकारमध्ये/समाजामध्ये सर्वच लोक कामगार असतील. याचाच अर्थ असा की सर्व कामगाराची एकाधिकारशाही म्हणजेच सर्व लोकांचीच एकाधिकारशाही.. हे तर लोकशाहीचे अत्याधुनिक रुपच म्हणावे!! आणि तिसरी गोष्ट अशी की जस मी आधी म्हणल की हा विचार प्रवाही आहे.. परिस्थीतीनुसार रुप रंग आकार बदलण्याची क्षमता आहे ह्या विचारात.. फक्त तो बदलवणारा हवा...
आता रहिला तो भारताबाबतचा प्रश्न. हा हे एक आपल अपयश असु शकेल की भारतीय साम्यवाद निर्माण करण्याचा प्रयत्न खुपच कमी साम्यवाद्यांनी केला. भारत देशाला योग्य असा साम्यावाद आपण देवु शकलो नाही.. अगदी कालपर्यंत आम्ही भारताचा/भारतातील साम्यवाद असा उल्लेख करत होतो, भारतीय साम्यवाद आणि भारताचा साम्यवाद ह्या फरक आहे ना.. (म्हणजे अमेझॉन ही भारतातील मोठ्ठी ऑनलाईन खरेदीची साईट आहे पण फ्लिपकार्ट ही भारतीय मोठ्ठी ऑनलाईन खरेदीची साईट आहे फरक आहे ना!) पण आजचा हा संघर्ष बघितला की आशा वाटतेय की ह्या संघर्षातून भारतातील साम्यवादाला नवा आकार मिळेल आणि भारतीय साम्यवाद निर्माण होईल जो भारतात रुजलेल्या लोकशाहीला (लोकशाहीच कारण इतक्या वैविध्यतेमध्ये दुसरी कोणतीही व्यवस्था टिकणार नाही आणि हेच कारण असाव भारताच्या लोकशाहीच्या (अर्धमेल्या!!) टिकण्या मागच..) पोषक असेल....
कोणताही विचारवादी असला तरी तो आशावादीच असतो अगदी निराशावादी माणुस त्याची निराशा टिकावी म्हणुन आशावादी असतो!! मीही आशावादी आहे....
विवेक जाधव
आइसा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती