पावित्र्य

मी आत्ताच एक लेख वाचाला. आणि मी पार हादरूनच गेलो. मग म्हणल अभ्यासाला थोडासा विराम द्यावा आणि काही तरी लिहाव.
सहसा मी सगळ्या संघटनांच्या, पक्षांच्या वेबसाईट नियमित वाचतो. कारण पुढील व्यक्ती काय लिहितोय, का लिहितोय आणि आपल काय मत आहे? ह्यासाठी ते महत्वाच असत.
तर सनातन प्रभात च्या साईट वर एक लेख आहे, 'शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवाच, अशी धर्मद्रोही मागणी करणार्‍यांना दिलेले समर्पक उत्तर !' ह्या नावाचा. तर ह्यात लेखकाने अश्या काही गोष्टीं मांडल्या आहेत की त्यावर नुसती नापंसंतीच नाही तर विरोध दाखवायला हवा. लेखक एका ठिकाणी म्हणतो की मंदिराच्या गाभाराच पावित्र प्रत्येकाने राखायालाच हव. मग तो पुरुष असो वा महिला. पुढे म्हणतो दारू पिऊन आले पुरुष हाही मंदिरात प्रवेश करू शकत नाही कारण त्याने मंदिर अपवित्र होते. म्हणजे हा लेखक महिलेची तुलाना दारू पिऊन आलेल्या महिलेशी करतोय. मासिक पाळी येण हे दारू पिण्यासारख आहे अस त्याच मत… मित्रांनो हा खूपच घातक विचार आहे. आणि हा कुठून आला, मनुस्मृतीतून आला का आणि कुठून हे ह्या घडीला महत्वाच नाही आहे. महत्वाच हे आहे की हा अजून कसा अस्तित्वात आहे.हा लेखक म्हणतो की "स्त्रियांना येणारी मासिक पाळी, प्रसूती ही रज-तमामुळे अशुद्ध तत्त्वाची असते; म्हणून तो काळ निषिद्ध मानला जातो." मासिक पाळी येण हे खरच अपवित्र आहे का, त्यामुळे परिसर अशुद्ध होतो का? मग हे जर खर असेल तर मग घाम येण हे पण अपवित्रच आहे ना. जर प्रसूती ही अशुद्ध तत्त्वांची असेल तर मग ही मंदिरे बंद करा कारण जगात सगळेच अशुद्ध आहेत, मग तो मंदिरातला पुजारीही अपवित्र आहे. काही लोक माणसाच्या (स्त्रियांच्या) शरीरातून येणाऱ्या रक्तालाही अपवित्र मानत आहेत. मित्रांनो, ह्यांच्या मते आपल्याला जन्म देणारी आई ही मासिक पाळीवेळी अपवित्र असते! आणि ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत ते पवित्र आहेत. ते देवाला पुजू शकतात सगळ करू शकतात. पुढे हा लेखक म्हणतो की "वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीने परपुरुषाशी ठेवलेले संबंध, हे धर्मशास्त्राविरुद्ध असतात. त्यामुळे त्यांच्या संबंधाला समाजात स्थान नसते, तसेच त्यांच्या अपत्यांनाही सामाजिक मान्यता मिळत नाही." म्हणजे आता ह्यांनी शरीराला जिथे जखम झाली आहे तो भाग शरीराचाच नाही, अस घोषित केलय. म्हणजे वेश्याधंदा करणारी स्त्री आणि तिची मुले ही समाजबाह्य, 'अपवित्र', पण त्याना अपवित्र करणारा, त्यांचा भोग घेणारा तो पुरुष मात्र शुद्ध, समाजभूषक!
मित्रानो ज्या देशात, 'भारतमाता की जय' ही घोषणा देतात, त्यासाठी जबरदस्ती करतात त्याच देशात तेच लोक महिलांना, स्त्रियांना, मातांना अपवित्र, अशुद्ध म्हणत आहेत. आणि हीच दुर्भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळेच धर्मस्थळात महिलांना प्रवेश मिळावा ही समानतेची लढाई तर आहेच पण ती महिलांच्या सन्मानाची पण आहे.
एक मुद्दा राहिलाच… लेखक सावित्रीधाम मंदिराच उदाहरण देतो. तिथ पुरुषांना प्रवेश नाही आहे. मला त्या मंदिराबाबत तितकीशी माहिती नाही आहे पण तरीही एक बाब अशी कि ह्यामुळे कुठेही पुरुषांच्या सन्मानाला धक्का बसत नाही आणि दुसरी बाब अशी तर तिथे पुरुषांनाही समाना हक्क आणि प्रवेश मिळायला हवा. आणि त्याबद्दल कोणतीही महिला विरोध नाही करणार….

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती