बा. सी. मर्ढेकरांच्या जन्मदिनानिमित्त..

सकाळी सकाळी। उघडावे वृत्तपत्र,
पहावे राशीचक्र। ‘श्रद्धेपोटी’॥

कालची ‘चपटी’। करावी ‘उलटी’,
सुगंधी अत्तर। माळावा देही॥

घरातून आज। लवकर निघावे,
नजर लावावी। तिच्या दारी॥

बाहेरूनच करावे। इशारे गुलाबी,
तिच्या घरी म्हणे। कुत्री असती॥

इतक्यात यावा। गोजिरा कोणी,
ध्यानी ना मनी। तिस मारावी मिठ्ठी॥

चुरचुर आवाज। यावा कानी,
प्रेमाच्या काचा। फुटाव्या ह्रदयी॥

काळाची कृपा। काय सांगावी,
व्हावा अंधार। सुर्याखाली॥

होता सायंकाळ। गाठावी गल्ली,
पुन्हा तीच 'चपटी'। तीच 'उधारी'॥

आता नवा अंधार। रात्र कालची॥
करावी नशा जुनीच। ‘अंध:श्रद्धेपोटी’॥

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

क्रांती

Atheist having spiritual experience