पाडगावकरांचा मंगेश- एक आनंदयात्री
भटके पक्षी मधल्या प्रारंभ कवितेतल्या चार ओळी - मी रहातो बोलत: माझे शब्द गर्द पाऊस, माझे शब्द ओल्या उन्हातला फुलपाखरांचा झिम्मा; तू ऐकत असतेस तुझ्यामाझ्यापलीकडे जाऊन; माझे जगणे होते एका गाण्याचा हळुवार प्रारंभ... मंगेश पाडगावकर.. मी तशी त्यांची खुपशी पुस्तक वाचलीत.. जिप्सी, शर्मिष्ठा, भटके पक्षी, कविता माणसांच्या माणसांसाठी, बायबल: नवा करार (भाषांतर व मुक्तिचिंतन) इत्यादी.. पण पाडगावकर हे वाचन्यापेक्षा मी ऐकलेत खुप.. त्यांची गाणी, बालगीते, बडबडगीते... सांग सांग भोलानाथ ने तर पुर बालपण सुट्टीच्या आशेवर अन् शाळेच्या रुसव्या आनंदावर घालवल. येवढच काय तर जुन्या काळी म्हणे त्यांची गाणी गाऊन मुलींना पटवत असत! असो पण का कुणास ठाऊक मला त्यांची 'शर्मिष्ठा'च खुप भाळली... तशी जिप्सी ही भन्नाटच आहे.. पण शर्मिष्ठातल ते काव्यात्मक संवाद विशेषतः ययाती आणि शर्मिष्ठेमधला तो कित्येक छटांनी बहरलेला प्रेमाचा संवाद.. खरच आदिम काळातल प्रेम डोळ्यासमोर उभा करतो.. खर तर मी खुप निराशावादी होतो. काय म्हणतात इंग्लिश मध्ये ते पेसिमिस्टिक... अजुनही आहे थोडासा.. जो काही उत्साही आहे तो केवळ पाडगावकरांमु...