पाडगावकरांचा मंगेश- एक आनंदयात्री

भटके पक्षी मधल्या प्रारंभ कवितेतल्या चार ओळी -
मी रहातो बोलत: माझे शब्द गर्द पाऊस,
माझे शब्द ओल्या उन्हातला फुलपाखरांचा झिम्मा;
तू ऐकत असतेस तुझ्यामाझ्यापलीकडे जाऊन;
माझे जगणे होते एका गाण्याचा हळुवार प्रारंभ...

मंगेश पाडगावकर.. मी तशी त्यांची खुपशी पुस्तक वाचलीत.. जिप्सी, शर्मिष्ठा, भटके पक्षी, कविता माणसांच्या माणसांसाठी, बायबल: नवा करार (भाषांतर व मुक्तिचिंतन) इत्यादी.. पण पाडगावकर हे वाचन्यापेक्षा मी ऐकलेत खुप.. त्यांची गाणी, बालगीते, बडबडगीते... सांग सांग भोलानाथ ने तर पुर बालपण सुट्टीच्या आशेवर अन् शाळेच्या रुसव्या आनंदावर घालवल. येवढच काय तर जुन्या काळी म्हणे त्यांची गाणी गाऊन मुलींना पटवत असत!
असो पण का कुणास ठाऊक मला त्यांची 'शर्मिष्ठा'च खुप भाळली... तशी जिप्सी ही भन्नाटच आहे.. पण शर्मिष्ठातल ते काव्यात्मक संवाद विशेषतः ययाती आणि शर्मिष्ठेमधला तो कित्येक छटांनी बहरलेला प्रेमाचा संवाद.. खरच आदिम काळातल प्रेम डोळ्यासमोर उभा करतो.. खर तर मी खुप निराशावादी होतो. काय म्हणतात इंग्लिश मध्ये ते पेसिमिस्टिक... अजुनही आहे थोडासा.. जो काही उत्साही आहे तो केवळ पाडगावकरांमुळेच... या जन्मावर या जगण्यावर, माझे जिवणगाणे ही गाणी खरच नवचैतन्य आणतात. आणि त्यात हा माणुस, साठी-सत्तरी गाठुनही इतक्या उत्साहाने बोलयचा की मला माझीच लाज वाटायची! अशी पाखरे येती, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक रानी अश्या गाण्यातून अफाट प्रेम, अकस्मित विरह, त्या दरम्यान तुटक होणारा श्वास अन् त्या वरच आशावादी विश्वासाच कवच यांच अपुर्व मिलन साधणारा तो कवी हा प्रेमदुतच असला पाहिजे...


सांगलीत एकदा साहित्य संमेलन होत. आता मला ते मी कितवीत असताना होत, हेही आठवत नाही. मला तसा वाचण्याचा छंद आहे (कदाचित त्यावेळी मी चंपक जादुगर आणि राक्षक अशी पुस्तके वाचत असेन) पण ते साहित्य काय असत आणि त्याच संमेलन कस असत काही माहित नव्हत त्यावेळी... (तस नावही बोअरिंगच आहे म्हणा!) तरीही घरच्यांनी मला जबरजस्ती नेल (क्रिकेटवर पाणी सोडुन!). तिथे पहिल्यांदा मी पाडगावकरांना ऐकल..तेव्हापासून त्यांना भेटायची खुप ईच्छा होती पण ते फक्त स्वप्न बनुन राहिलय आता...
शेवटी मला आवडलेली पाडगावकरांची एक कविता- मिटुन...
पुस्तक अर्धेच वाचून मिटून टाकाव
तस मिटून टाकाव लागत आयुष्य काही वेळा.
पुस्तक कोणी मिटल?
तू की मी?
की दोघांनीही?
का मिटल?
वाचण्याआधी पुढच
सगळ कळल होत म्ह्णून?
वाचण्याची हिंमत नव्हती म्हणून?
मिटल तर मिटल:
पण जे वाचल होत
ते आठवायच कशासाठी?
मोरसुध्दा
पंख मिटून घेतातच ना?
कदाचित सरत्या वर्षान आधीच्या जुन्या खार्‍या पाण्याबरोबर काहीस गोड, गोंडस, अतरंगी, भन्नाट, बालिश, उत्साही, हसमुखी अस काहीतरी असाव म्हणून आनंदयात्रीलाच मिटत्या पापणीत सामावून घेतल असाव...
सरांच्या आठवणीही चेहऱ्यावर हास्य उमटवतात… 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती