मूका गोंगाट

कुठेतरी आग लागली होती काल
पण खर तर चिता जळत होत्या असंख्य
खुपश्या वस्तू हरवल्यात, जळल्यात…
जाळल्यात…
मग मीही जाळून टाकल माझ मनुष्यत्वही
प्राणी बनून राहिलोय आता फक्त
मानव समाजाने अंगावर डागलेली कुंपणेही तोडून नग्न झालोय
त्या आगीन काहीतरी सकारात्मक केल!

कारण ह्या मानव समाजाचे नियमच काही वेगळे!
इथ कुणाच तरी पावित्र कुणाच्या तरी मूत्रात लपलय,
अन् कुणाची तरी मुक्ती कुणाच्या तरी स्पर्शात
इथ गांधी बापूचा फोटो
पोलिस स्टेशनात पण असतो
आणि बनावट नोटे वरही
अहिंसा झालीय पोरकी
अन् प्रेम झालय लुळ,
स्पर्शहीन मूर्तीसम
ना त्या मूर्त्यांना संवेदना आहेत
ना प्रेमाला भाव
ना अहिंसेला वाली
अन दुर्दैव अस की
मूर्ती भंग करू शकत नाही
ना अहिंसेच सांत्वन 
ना प्रेमाला दवा देवु शकत




मग म्हणल सोडूया हा समाजच
कारण आजकाल
खूप गुदमरत होत
आवाजांना शब्दच नव्हते
अन् असलेच शब्द
तर ते होते भावनाहीन
शाश्वत होत्या त्या फक्त वेदना..
त्या बोलक्या षंढ मौनापेक्षा
मुक्या प्राण्यांचा संवेदनशील गोंगाटच बरा..
त्यात निदान भाव तरी असतो
वेदना जरी असल्या तरी
नपुंसकत्व नसत…








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती