माझा राजा हरला, होय माझा अजिक्य राजा हरला.. त्याला हरवल तुम्ही, मी सर्वांनी... परवा बाबासाहेबांना हरवल.. आज शिवाजी महाराजांना.. ‘मावळ्यांची’ ही कामगिरी पाहुन महाराजांना काय वाटत असेल ह्याचा विचार न केलेलाच बरा... तुम्ही म्हणाल काय झाल मला अचानक?? आता रहावेना ओ... खरच हा आपला समाज हा असा समुदाय आहे ज्याला सवय आहे लाचारीची.. जमिनदाराची लाचारी, जमिनदार नसेल तर सत्ताधार्यांची आणि ते नसतील तर महापुरुषांच्या पुतळ्यांची, प्रतिमांची लाचारी... आणि हो त्या लाचारीत स्वाभिमानही असतो बर का.. आणि मग तो स्वाभिमान जयंती, पुण्यतिथी मधून दिसतो. शाळेत एकदा एकाने प्रश्न विचारला होता की आपण जयंती का साजरी करतो? तर शिक्षक म्हणाले की व्यक्तीच्या विचारांचा प्रसार व्हावा म्हणून आपण जयंती साजरी करतो... पण परवाची शिवजयंती बघितली आणि जयंती ह्या संकल्पनेवरचा विश्वासच उडला... शिवजयंती.. शिवजयंती हा चिंतनदिन आहे.. आत्मचिंतनाचा, सामाजिकचिंतनाचा... चिंतना त्या जानत्या राजाच, त्याच्या धोरणांच, विचारांच... पण नाही.. ही शिवजयंती अशी काही साजरी करण्यात आली की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी झाला नसुन इंग्लंडच्या राजघराण्...