चूक
चूक
माझ काय चुकल की ,
माझी नौका फुटली .
मी वल्व्हत तर नीट होतो ,
तरी ती फुटली
आता आसमंत व्यापून टाकणाऱ्या
अन आकाशाला छेदणाऱ्या
समुद्रात मी एकटाच
तोही फुटक्या नावेसह
समुद्रात बुडण्याची भीती नाही ,
पण भीती आहे मेंदूला छळणाऱ्या
अन हृदयाला चिरणाऱ्या
त्या शांततेची अन एकांताची
तो सागर जणू असुसलेलाच आहे
मला गिळण्यासाठी
तो वाट बघतोय मी हतबल होण्याची
पण ….
एकटा असलो म्हणून काय झाल ?
अजूनही धावतंय तप्त , गडद , लाल
रक्त नसानसातून ….
महाकाय समुद्रापुढे तुटपुंजा
असलो तरी लढतोय ,
'नक्कीच लावीन नौका पार'
हा विश्वास , आश्वासन स्वत:लाच देऊन
अडखळत , हेलकावे खात
फुटकी नौका वल्व्हवतोय
माझ्यावरच मी सुखावतोय
अन पूर्ण करतोय
अर्धा उरलेला समुद्रप्रवास
पण तरीही ….
माझं काय चुकल की
माझी नौका फुटली
हा प्रश्न अजून सतावतोय ….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा