भेट तुकोबाची
वैकुठवासी एक । भेटला मज
वाट धरली आम्ही । पंढरीची
त्याचे भलतेच साहस । म्हणे उजेड शोध
मला रात्रीची साथ । तिमिरासाठी
तो सांभाळे भार । स्वत:चाच स्वत:
मी वाहतो भोग । चंद्रभागेत
त्याचा त्यावर रोष । विटेचा सुटेना मोह
मी असा शांत । माझा लोभ देहावरी
त्याचा हा हट्टाहास । गोड व्हावा शेवट
मी करतो आभास । सुख-दु:खांचा
मी म्हणे तुकोबा। हाच का मोक्ष
आता बुडवी गाथा । मोक्षासाठी
तुका म्हणे विवेक । बस झाला खेळ
मी करतो सुरवात । नव्या खेळाची
वाट धरली आम्ही । पंढरीची
त्याचे भलतेच साहस । म्हणे उजेड शोध
मला रात्रीची साथ । तिमिरासाठी
तो सांभाळे भार । स्वत:चाच स्वत:
मी वाहतो भोग । चंद्रभागेत
त्याचा त्यावर रोष । विटेचा सुटेना मोह
मी असा शांत । माझा लोभ देहावरी
त्याचा हा हट्टाहास । गोड व्हावा शेवट
मी करतो आभास । सुख-दु:खांचा
मी म्हणे तुकोबा। हाच का मोक्ष
आता बुडवी गाथा । मोक्षासाठी
तुका म्हणे विवेक । बस झाला खेळ
मी करतो सुरवात । नव्या खेळाची
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा