काहीस असच
छेडून मंद जीव हा शब्दांनी घात केला उरला फक्त एकांत झुला जसा हलतो सागर खुला देखण्या सुरांचा नाद हा घोटून घोटून गायला प्रतिश्वासांचा जणू हल्ला श्वासांनी कसाबसा पचवला आता झुलवता झुलवता तुटलं आकाश पेटला वणवा भग्नावस्थाचा हा राग पेटत्या झाडांनो तुम्हीच मिटवा ह्या तरल शांततेचा हा असा सरळपणा ह्या शांत थंडीतून 'तो' मुसळधार पाझरावा पाझरलेल्या थंडीतून शांत व्हावं सार स्थिरावलेल्या झुल्यावर निपचित पडाव गार वार