अरे टिपूसा, टिपूसा
अरे टिपूसा, टिपूसा
तुझ्या नावच र गाण आज गातोय रे मी ह्या मातीच्या कुशीत
अरे टिपूसा, टिपूसा
अशी कशी तुझी खोड
माझ्या पापणीतल थेंब आज आटून मेलय
अरे टिपूसा, टिपूसा
बघ जळलया रान
त्याच्या दारात ह्या आज करपलया प्योर
अरे टिपूसा, टिपूसा
आता नको हा खेळ
माझ्या मातीत आता नाव कोरुन टाक
अरे टिपूसा, टिपूसा
जस चांदण्याच र सोन
तुझ्यासंग आज बघ नाचली ही लेकर
अरे टिपूसा, टिपूसा
आज बरसून जा र
माझ्या मायचा पदर आज भरुन टाक
अरे टिपूसा, टिपूसा
कस फेडु रे पांग
तुझी येण्याची हाक माझ्या मायची रे थाप
अरे टिपूसा, टिपूसा
अस कस भिजवून सोडलस
जळती चिता आता विझवून टाक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा