फुलपाखरु
फुलपाखरू आता खरच फुलपाखर दिसेनात , का भिरभिरत नाहीत फुलपाखर ? गमावलीय का त्यांनी पंखातली शक्ती ? का दडपण आहे त्यांच्यावर गरुडाभरारीच ? म्हणुनच सोडल असेल त्यांनी भिरभिरण , अन सुरु केल असेल त्यांनी भटकण …. आता खरच फुलपाखर दिसेनात , धुरकटलेल्या , शिस्तीच्या जगात त्यांनच ते वेड्यागत उडण काय कामच ? ह्या जगाला हवीय झेप गगनाला छेदणारी , कोणालाच नकोय मधाची मिठास …. ह्या बेचव जगात आता खरच फुलपाखर दिसेनात ….