तुझ येण
तुझ येण
तू जेव्हा आलीस
तेव्हा सुर्यसुद्धा कोमेजला
चांदण्यांच तर सोड , पण
चंद्रसुद्धा स्तब्ध झाला ….
तू जेव्हा आलीस तेव्हा
रातराणीला पण दिवसा
जाग आली ,
अन का कुणास ठाऊक
दवबिंदुलापण दिवसा जाण आली ….
तू थांबलीस तेव्हा
गुलामोहाराने वर्षाव केला ,
डबक्याच्या पाण्यालापण
गंगाजलाचा स्वाद आला ….
पण ….
तू जाशील तेव्हा
मृगाचे चांदणेपण गळेल ,
रातराणी सुगंध विसरेल
गुलमोहर बरसण बंद करेल
तू जाशील तेव्हा ….
तुझ्यावर कविता करणारापण नसेल ….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा