विकृती

            विकृती 


                  रक्तच  नसलेल्या जखमा भळभळताहेत  
         विकृती डसतेय ,
तिच विष ओकतेय . 
रक्तच नसल्याने डाग पडत नाहीत 
तरीही उरलेसुरले ठसे ,
 तेही मिटवले जातात  अभिमानाने 

नराधम शमवताहेत भूक 
गूढ , गर्द शांततेत 
ती शांततापण माजवतेय 
दंगा शांतपणे 
सगळच घडतय शांतपणे 
करणारे करताहेत , भोगणारे भोगताहेत 
आणि आम्ही , आम्ही तर मुंडणच 
केलय सहानुभूतीच 
पण ……. 
का आज दुर्गामाता शांत झालीय ?
का आज आटलय रक्त फुलपाकळीतल ?
धरणीपण का कंपत नाही ?
निरुत्तरित आहे 'कारण'
 हतबल झालय 'कर्म'
अन कर्ता मात्र  मोकाट झालाय …. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती