परवा मी असाच बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा माझे जुने सर भेटले . ते म्हणत होते की , ' तुमच काही खर नाही , १० - १२ चा नुसता गोंधळ चालू आहे , शिक्षणाचा नुसता बाजार भरवलाय , सगळे अंगठे बहादूर आहेत आणि त्यांनाच आम्ही निवडून देतो ' असच काहीस बोलत होते . 
ह्यावर घरी गेल्यावर खूप विचार केला . त्यानंतर अस लक्षात आल  की , आम्ही जिथे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे तिथे देत नाही आणि जिथे द्यायला नको तिथे मात्र हमखास लक्ष देतो . आता हेच बघा , १२ ला national cet ठेवाची का नाही ह्यावरची पालकांची चर्चा …. आम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त आम्हाला अभ्यास करायचा आहे . सर्वोच्च अभ्यास करायचा आहे …. 
शासनाच्या बाबतीत बोलायचं तर खरच उदासीनता आहे . शासनाने शाळेबाबत कोणतेही धोरण आखताना मुख्य हेतू विसरता  कामा नये . उदाहरणार्थ शाळेत अन्न वाटप कार्यक्रम सुरु करण्यात आला . तो स्वागतार्ह आहे पण तो साध्य करताना शाळेतला शिक्षक आचारी तर नाही ना झाला हे पण बघण गरजेच आहे . म्हणजे शाळेत जाण्याचा हेतूच बदलेल . We require quality , not quantity.... ' महाराष्ट्र राज्याचा अमुक टक्का निकाल लागला ' हे अभिमानाने सांगण्यापेक्षा त्यातील कितीजण खऱ्या गुणवत्तेचे आहेत , हे आम्ही कधी तपासणार ? ह्यामुळे शिक्षणाचा दर्जा कमी होत आहे . शासनाला हात जोडून विनंती आहे की शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा . नाही तर पुरोगामी महाराष्ट्र कधी बेचिराक होईल हे कळणार पण नाही . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती