होय म्हणशील ?
होय म्हणशील ?
तुझ्या प्रेमात आंधळ्या
झालेल्या मला
तुझी तेजस्वी किरण देशील ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
दु:खाच्या पटावर
भांबावलेल्या मला
तू चितपट करशील ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
भांबावलेल्या मला
तू चितपट करशील ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
तुझ सौंदर्य कमवण्यासाठी
अग्निकुंडात तपश्चर्या करणाऱ्या मला
तुझ शीतल कवच देशील ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
अग्निकुंडात तपश्चर्या करणाऱ्या मला
तुझ शीतल कवच देशील ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
तुझ मन जिंकण्यासाठी
प्रत्यक्षात देवकीनंदनाला
आव्हान देणाऱ्या मला
तुझ मन देशील ?
प्रत्यक्षात देवकीनंदनाला
आव्हान देणाऱ्या मला
तुझ मन देशील ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
तुझ्यासाठी फुल तोडताना
साप डसलेल्या मला ,
तुझा अमृतस्पर्श देशील ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
अन शेवटी ,
जेव्हा पडलो असेन मी चितेवर
डोळे उघडे ठेवून ,
तेव्हा येशील का
माझे डोळे मिटवायला ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
जेव्हा पडलो असेन मी चितेवर
डोळे उघडे ठेवून ,
तेव्हा येशील का
माझे डोळे मिटवायला ?
बोल ना , मला होय म्हणशील ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा