पश्चाताप
पश्चाताप
हे गळणारे अश्रू , काही अश्रू नव्हेत
हे तर रक्तच आहे मनाला झालेल्या जखमेच
मित्रा जीव द्यायलापण तयार होतो
तुझ्यासाठी
पण तू चोरून घेतलास
माझा जन्मच निष्फळ झाला
त्या मृत्युंजयाच्या विद्येसारखा
सावलीपण लाजेल
इतकी तुला साथ दिली
शबरीप्रमाणे सुख वेचून
दिली रे तुला
देवच मानत होतो तुला
मला माहीत आहे ,
कधीच चुकत नाही रे देव
मीच चुकलो असेन कदाचित
तु आनंदी असशील तर
मी जगेन शापितासारखा ,
मरेनपण शापितासारखा
पण तुझ्याशिवाय
माझ्या जगण्याला शापच बसलाय
एका शापितासारखा ….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा