बदल

बदल 
चिमुकल्यांचे खेळ बदलले 
गोट्याच्या रिंगणात alfa , bita , gama नाचले . 

गरगरणाऱ्या भोवऱ्याला newton law  ने रोखले ,
पळणाऱ्या पावलांना friction ने अडवले . 

उंच भिरभिरणाऱ्या विटीला gravity ने खेचले ,
गळणारे अश्रू  a.p. , g.p. गाऊ लागले . 

भांडी - कुंडी , घर  - घर खेळणारे 
प्रयोगशाळेत जाऊ लागले ,
चिखलात लोळणारे 
आता concentrated solution मध्ये गुरफुटले . 

चिमुकल्यांचे सणपण बदलले 
होळीला hydrogen , oxygen 
भोवती बोंबलू लागले ,
तर संक्रांतीला 
वहीतला kite उडवू लागले . 

शेवटी darwin ची theory समजू लागले ,
इवलासा श्वास घेत धडपडू लागले . 

खरच चिमुकल्यांचे खेळ , सण बदलले ,
त्यांचे जग पण बदलले ,

पण …. 
theory , law तसेच राहिले 
चिमुकले मात्र बदलले 
टाय , बूट , सूट घालू लागले 
चिमुकले मोठ्ठे होऊ लागले !  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती