आलीस ना !
आलीस ना !
का ग आलीस माझ्या जीवनात
कोसळणाऱ्या पावसाच्या
चमकणाऱ्या विजेसारखी
तू का आलीस ?
वाटल जाशील
वाऱ्याच्या वेगाने धोका देऊन ,
अन लुप्त होशील मृगजालासारखी
पण नाही ,
तू गेली नाहीस
चिटकून राहिलीस
काट्याबरोबर एका सुंदर फुलासारखी
वाटल तुलाही येईल तिटकारा
जगतकोशात नवनिर्मिती करणाऱ्या कवीचा
पण नाही ,
तू सुखावलीस
कारण तूही शोधत होतीस माझ्यासारखीच
विविध रंग त्याच कोशात
पण वाटल नव्हत की
तू इतकी रमशील माझ्याबरोबर
अन विरून जाशील माझ्या स्वतकोश्यात
खरच वाटल नव्हत ग ,
पण आता आलीस ना !
आता मग जावू नकोस
एकट्याला सोडून
जायचेच असेल तर मीही येईन
अन विलीन होऊ दोघेही याच आसमंतात ….
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा