अनामिक


अनामिक 
तुझ्यावर कविता लिहितोय 
नाव नसलेली ,
नाव नसलेली आहे पण
अनोळखी नाही ,
निरर्थक तर मुळीच नाही 
प्रत्येक शब्दात लपवलाय
तुझा सहवास   
जसा फुल सुहास 
जपतात ना अगदी तसाच 

भळभळणाऱ्या जखमेलापण 
लाजवणारा तुझा  स्पर्श 
अजून साठवलाय 
भटकणाऱ्या स्मृतीपाखरांकडे 
उकळणाऱ्या ज्वालेलाही शांत 
करणार तुझ स्मीत हस्य 
तेही दडवलय 
मनाच्या निर्जीव कोपऱ्यात 
तरीही तो जिवंत आहे 
फक्त तुझ्याचमुळे …. 
ते सार आता ठसवतोय
तुझ्या अनामिक कवितेत …. 

एक नाव नसलेली कविता 
फक्त तुझ्याचसाठी ….    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रदिन

Atheist having spiritual experience

क्रांती