पोस्ट्स

2013 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निरोप

इमेज
निरोप  आता बघवत नाही रे  निरोप घेण - देण , सहनही होत नाही  पण तरीही हसतोय  तुझ्या समाधनासाठी  मिठागरे गच्च भरलीत  डोळ्यातली  पिकल पान गळाव , तसच गळतय पाणी  त्या मिठागरातून आता आवरताही  येईना  त्याच्या फुटलेल्या बांधाला  आता जीवन अमावस्याच  बनून राहिलंय बघ  लाखो\चांदण्या असूनही  चंद्रच हरवून बसलोय  आता चालतानापण एक पाऊल  कमी होणार , लंगड्यासारख  रहाव लागणार , शब्दांना अर्थाशिवाय , अर्थांना भावनांशिवाय  रहाव लागणार , अन खऱ्या अर्थाने मलापण ' महाकाव्याशिवाय ' रहाव लागणार …. 

फुलपाखरु

इमेज
                                 फुलपाखरू आता खरच फुलपाखर दिसेनात , का भिरभिरत नाहीत फुलपाखर ? गमावलीय का त्यांनी पंखातली शक्ती ? का दडपण आहे त्यांच्यावर गरुडाभरारीच ? म्हणुनच सोडल असेल त्यांनी  भिरभिरण , अन सुरु केल असेल त्यांनी भटकण ….   आता खरच फुलपाखर दिसेनात , धुरकटलेल्या , शिस्तीच्या जगात  त्यांनच ते वेड्यागत उडण काय कामच ? ह्या जगाला हवीय झेप  गगनाला छेदणारी ,  कोणालाच नकोय मधाची मिठास ….  ह्या बेचव जगात  आता खरच फुलपाखर दिसेनात …. 
परवा मी असाच बाहेर फिरायला गेलो होतो तेव्हा माझे जुने सर भेटले . ते म्हणत होते की , ' तुमच काही खर नाही , १० - १२ चा नुसता गोंधळ चालू आहे , शिक्षणाचा नुसता बाजार भरवलाय , सगळे अंगठे बहादूर आहेत आणि त्यांनाच आम्ही निवडून देतो ' असच काहीस बोलत होते .  ह्यावर घरी गेल्यावर खूप विचार केला . त्यानंतर अस लक्षात आल  की , आम्ही जिथे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे तिथे देत नाही आणि जिथे द्यायला नको तिथे मात्र हमखास लक्ष देतो . आता हेच बघा , १२ ला national cet ठेवाची का नाही ह्यावरची पालकांची चर्चा …. आम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त आम्हाला अभ्यास करायचा आहे . सर्वोच्च अभ्यास करायचा आहे ….  शासनाच्या बाबतीत बोलायचं तर खरच उदासीनता आहे . शासनाने शाळेबाबत कोणतेही धोरण आखताना मुख्य हेतू विसरता  कामा नये . उदाहरणार्थ शाळेत अन्न वाटप कार्यक्रम सुरु करण्यात आला . तो स्वागतार्ह आहे पण तो साध्य करताना शाळेतला शिक्षक आचारी तर नाही ना झाला हे पण बघण गरजेच आहे . म्हणजे शाळेत जाण्याचा हेतूच बदलेल . We require quality , not quantity.... ' महाराष्ट्र राज्याचा अमु...

होय म्हणशील ?

इमेज
       होय म्हणशील ? तुझ्या प्रेमात आंधळ्या  झालेल्या मला  तुझी तेजस्वी किरण देशील ? बोल ना , मला होय म्हणशील ? दु:खाच्या पटावर भांबावलेल्या मला तू चितपट करशील ? बोल ना , मला होय म्हणशील ?   तुझ सौंदर्य कमवण्यासाठी अग्निकुंडात तपश्चर्या करणाऱ्या मला  तुझ शीतल कवच देशील ? बोल ना , मला होय म्हणशील ?   तुझ मन जिंकण्यासाठी प्रत्यक्षात देवकीनंदनाला आव्हान देणाऱ्या मला तुझ मन देशील ? बोल ना , मला होय म्हणशील ?   तुझ्यासाठी फुल तोडताना  साप डसलेल्या मला , तुझा अमृतस्पर्श देशील ? बोल ना , मला होय म्हणशील ?             अन शेवटी , जेव्हा पडलो असेन मी चितेवर डोळे उघडे ठेवून , तेव्हा येशील का माझे डोळे मिटवायला ? बोल ना , मला होय म्हणशील ?   

आलीस ना !

इमेज
आलीस ना ! का ग आलीस माझ्या जीवनात  कोसळणाऱ्या पावसाच्या  चमकणाऱ्या विजेसारखी  तू का आलीस ?   वाटल जाशील  वाऱ्याच्या वेगाने धोका देऊन , अन लुप्त होशील मृगजालासारखी  पण नाही , तू गेली नाहीस  चिटकून राहिलीस  काट्याबरोबर एका सुंदर फुलासारखी    वाटल तुलाही येईल तिटकारा  जगतकोशात नवनिर्मिती करणाऱ्या  कवीचा  पण नाही , तू सुखावलीस कारण तूही शोधत होतीस माझ्यासारखीच  विविध रंग त्याच कोशात    पण वाटल नव्हत की  तू इतकी रमशील माझ्याबरोबर  अन विरून जाशील माझ्या स्वतकोश्यात  खरच वाटल नव्हत ग ,   पण  आता आलीस ना ! आता मग जावू नकोस  एकट्याला सोडून  जायचेच असेल तर मीही येईन  अन विलीन होऊ दोघेही याच आसमंतात ….   

तुझ येण

इमेज
तुझ येण  तू जेव्हा आलीस  तेव्हा सुर्यसुद्धा कोमेजला  चांदण्यांच तर सोड , पण  चंद्रसुद्धा स्तब्ध झाला ….  तू जेव्हा आलीस तेव्हा  रातराणीला पण दिवसा  जाग आली , अन का कुणास ठाऊक  दवबिंदुलापण दिवसा जाण आली ….  तू थांबलीस तेव्हा  गुलामोहाराने वर्षाव केला , डबक्याच्या पाण्यालापण  गंगाजलाचा स्वाद आला ….  पण ….  तू जाशील तेव्हा  मृगाचे चांदणेपण गळेल , रातराणी सुगंध विसरेल  गुलमोहर बरसण  बंद करेल  तू जाशील तेव्हा ….  तुझ्यावर कविता करणारापण नसेल ….   

पश्चाताप

इमेज
पश्चाताप  हे गळणारे अश्रू , काही अश्रू नव्हेत  हे तर रक्तच आहे मनाला झालेल्या जखमेच  मित्रा जीव द्यायलापण तयार होतो  तुझ्यासाठी  पण तू चोरून घेतलास  माझा जन्मच निष्फळ झाला  त्या मृत्युंजयाच्या विद्येसारखा  सावलीपण लाजेल  इतकी तुला साथ दिली  शबरीप्रमाणे सुख वेचून  दिली रे तुला  देवच मानत होतो तुला  मला माहीत आहे , कधीच  चुकत नाही रे देव  मीच चुकलो असेन कदाचित  तु आनंदी असशील तर  मी जगेन शापितासारखा  , मरेनपण शापितासारखा  पण तुझ्याशिवाय  माझ्या जगण्याला शापच बसलाय  एका शापितासारखा …. 

चूक

इमेज
चूक  माझ काय चुकल की  , माझी नौका फुटली .  मी वल्व्हत तर नीट होतो , तरी ती फुटली  आता आसमंत व्यापून टाकणाऱ्या अन आकाशाला छेदणाऱ्या समुद्रात मी एकटाच  तोही फुटक्या नावेसह  समुद्रात बुडण्याची भीती नाही , पण भीती आहे मेंदूला छळणाऱ्या अन हृदयाला चिरणाऱ्या  त्या शांततेची अन एकांताची  तो सागर जणू असुसलेलाच आहे  मला गिळण्यासाठी  तो वाट बघतोय मी हतबल होण्याची  पण ….  एकटा  असलो म्हणून काय झाल ? अजूनही धावतंय तप्त , गडद , लाल  रक्त नसानसातून ….  महाकाय समुद्रापुढे तुटपुंजा  असलो तरी लढतोय , 'नक्कीच लावीन नौका पार' हा विश्वास , आश्वासन स्वत:लाच देऊन  अडखळत , हेलकावे खात  फुटकी नौका वल्व्हवतोय माझ्यावरच मी सुखावतोय  अन पूर्ण करतोय  अर्धा उरलेला समुद्रप्रवास  पण तरीही ….  माझं काय चुकल की  माझी नौका फुटली  हा प्रश्न अजून सतावतोय ….     

माझ जग

इमेज
माझ जग  का गुरफटून गेलय मन प्रश्न - उत्तरात ? का तोडत नाही आम्ही  प्रश्नचिंन्हांचे कुंपण ? आम्ही झालोय स्वार्थी  मेंदूलाच बनवलय सारथी  अनोळख्या मार्गावर जायला  आता भीतोय आम्ही , आम्हीच बनवलय आमच्या  नावाला अनामिक ….  पण पाडल्यात आता मी  परंपरागत भिंती  अन मुक्त झालोय मनाच्या पंखाबरोबर  तेव्हा कळल की , अरे , रात्र - दिवस , चंद्र  - सूर्य  हे तर आभासच आहेत मनाचे  पण ….  याचा अर्थ मी जगत होतो  आभासी जीवन ? म्हणजे माझी बुद्धीच  फसवत होती मला ? पण आता नाही ….  आता जगतोय मी मनासारखे  मी ठरवलं तर उगवेल चंद्रही पहाटे ….  …. फक्त माझ्या खऱ्या जगात !

बदल

इमेज
बदल  चिमुकल्यांचे खेळ बदलले  गोट्याच्या रिंगणात alfa , bita , gama नाचले .  गरगरणाऱ्या भोवऱ्याला newton law  ने रोखले , पळणाऱ्या पावलांना friction ने अडवले .  उंच भिरभिरणाऱ्या विटीला gravity ने खेचले , गळणारे अश्रू  a.p. , g.p. गाऊ लागले .  भांडी - कुंडी , घर  - घर खेळणारे  प्रयोगशाळेत जाऊ लागले , चिखलात लोळणारे  आता concentrated solution मध्ये गुरफुटले .  चिमुकल्यांचे सणपण बदलले  होळीला hydrogen , oxygen  भोवती बोंबलू लागले , तर संक्रांतीला  वहीतला kite उडवू लागले .  शेवटी darwin ची theory समजू लागले , इवलासा श्वास घेत धडपडू लागले .  खरच चिमुकल्यांचे खेळ , सण बदलले , त्यांचे जग पण बदलले , पण ….  theory , law तसेच राहिले  चिमुकले मात्र बदलले  टाय , बूट , सूट घालू लागले  चिमुकले मोठ्ठे होऊ लागले !  

अनामिक

इमेज
अनामिक   तुझ्यावर कविता लिहितोय   नाव   नसलेली , नाव   नसलेली आहे   पण अनोळखी नाही , निरर्थक तर मुळीच नाही   प्रत्येक शब्दात लपवलाय तुझा सहवास     जसा फुल सुहास  जपतात ना अगदी तसाच  भळभळणाऱ्या जखमेलापण  लाजवणारा तुझा  स्पर्श  अजून साठवलाय  भटकणाऱ्या स्मृतीपाखरांकडे  उकळणाऱ्या ज्वालेलाही शांत  करणार तुझ स्मीत हस्य  तेही दडवलय  मनाच्या निर्जीव कोपऱ्यात  तरीही तो जिवंत आहे  फक्त तुझ्याचमुळे ….  ते सार आता ठसवतोय तुझ्या अनामिक कवितेत ….  एक नाव नसलेली कविता  फक्त तुझ्याचसाठी ….    

विकृती

इमेज
            विकृती                    रक्तच  नसलेल्या जखमा भळभळताहेत            विकृती डसतेय , तिच विष ओकतेय .  रक्तच नसल्याने डाग पडत नाहीत  तरीही उरलेसुरले ठसे ,  तेही मिटवले जातात  अभिमानाने  नराधम शमवताहेत भूक  गूढ , गर्द शांततेत  ती शांततापण माजवतेय  दंगा शांतपणे  सगळच घडतय शांतपणे  करणारे करताहेत , भोगणारे भोगताहेत  आणि आम्ही , आम्ही तर मुंडणच  केलय सहानुभूतीच  पण …….  का आज दुर्गामाता शांत झालीय ? का आज आटलय रक्त फुलपाकळीतल ? धरणीपण का कंपत नाही ? निरुत्तरित आहे 'कारण'  हतबल झालय 'कर्म' अन कर्ता मात्र  मोकाट झालाय ….