पोस्ट्स

एप्रिल, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सैराट..

इमेज
झिंगाटगिरी करुन थकलेली, याड लागलेली ती दोघ लाल आकाशाखाली निपचित पडलेली ती दोघ हातात हात घेतलेली, मोरपंखाच्या छायेत लपलेली ती दोघ ह्या 'महान समाजाला' छोटस भोक पाडणारी ती दोघ त्यांची ही शांतता अजुन नागव करतेय त्या 'महान समाजाला' अन् आम्ही.. आम्ही एकच काम करतोय 'ठिगळ' लावण्याच आणि 'महान समाजाचा' विदृप देह लपवण्याच... 'ठिगळ' लावून लावून 'महान समाजाची' कापड 'नको नको' तिथ जिर्ण झालीत इतकी की 'महान समाजही' वेडीवाकडी हालचाल करतोय नागवपण लपवण्यासाठी हालचाल करून करून दुर्गंध येतोय घामाचा आता आम्ही होतोय अस्वस्थ पण ती दोघ शांत, निपचित आता पडु देत त्यांना शांत खुपदा बघितली 'महान समाजाची' आव आणलेली 'शांतता' आता त्या दोघांचीही 'शांतता' अनुभवावी म्हणतोय... त्यांच्या शांत स्पंदनातुन बाहेर आलेला 'सैराट' श्वास आत घुसला सरळ त्यान इतक पोखरलय की बेचैन वाटतय आता तरीही जिवंत आहे त्यांच्यातला 'सैराट' म्हणूनच पडु देत त्यांना शांत निपचित काहीस शांत सुस्थ असाव ह्या अस्वस्थ बेचैन जागेत

साम्यवाद!! भारतीय साम्यवाद...

मला खुप लोक मोजकेच पण एकसारखे सामान प्रश्न विचारतात. पहिला तो असा की तुम्ही साम्यावादी इतके बुरसटलेले बंदिस्त आणि विचाराबाबतीत संकुचित म्हणजेच न बदलणारे का असता? त्याच उत्तर अस आहे की खर तर एका विशिष्ट विचाराने बांधुन घेण कोणालाच आवडत नाही, मलाही नाही आवडत. जर विचारवादी म्हणजे एका विशिष्ट विचाराला थांबवुन स्थिर रहाणारा असा असेल तर मग मी साम्यवादी नाही. मग अश्या व्याख्येने लेनिन,फिडेल, जॉग-इल, ज्योति बसु हे कोणीच साम्यवादी नाहीत. कारण ते कधीच विचाराला चिटकून नाही राहिले. त्यांनी त्यांच्यापरीने ह्या विचाराला नवा आकार देण्याचा प्रयत्न केला आणि कार्ल मार्क्सच म्हणला होता की, "हुश्श्श मी मार्क्सवादी नाही!" तो खुणवतोय सर्वांनाच की हा विचारप्रवाह थांबवुन देवु नका.. प्रवाहित ठेवा कारण हा इतर विचारप्रवाहासारखा फक्त राजकीय किंवा सामजिक विचार नाही तर तो 'वैज्ञानिक विचार' आहे.. आणि विज्ञान हे नेहमी प्रवाही असत. म्हणुन साम्यवादी म्हणजे साम्यवादाला प्रवाही ठेवणारा एक विचारवंत, कार्यकर्ता (काहीही म्हणा), पण 'साम्यवादाचा गुलाम' नव्हे... ह्या व्याख्येने मी पण साम्यवादी आहे..

आदत

यहा अब अंधेरे से भी दोस्ती हो गयी  बंद दिवारों में उसकी छाव हमसफ़र बन गयी  मत खोलो दरवाजे खिडकीया  रोशनी ने मेरे तलाक को मंजुरी दे दी  कुछ दिनो पहले एक प्रेम कहाणी बंद थी शायद चित्रकार होगा प्रेमी  मैने जोडे कुछ लब्ज उस रेखां के साथ  तो देख ये तो अपनी दास्तान बन गयी  तूने कहा था एक दिन दुल्हन बने गी  तेरे रुख्सार पर खिला तिल है निशानी  सच तो ये है, मै जिंदा हु तू भी है,  झुटे है ओ लोग जो कहते है यहा से तू रुखसत हो गयी  बारिश में कितने गाने गाये थे हमने  अब यहा देख बारीश ही है आसुओ की  गाना गाने आयेगी? छोड, अब तो अकेले में गाने की आदत बन गई 

पावित्र्य

मी आत्ताच एक लेख वाचाला. आणि मी पार हादरूनच गेलो. मग म्हणल अभ्यासाला थोडासा विराम द्यावा आणि काही तरी लिहाव. सहसा मी सगळ्या संघटनांच्या, पक्षांच्या वेबसाईट नियमित वाचतो. कारण पुढील व्यक्ती काय लिहितोय, का लिहितोय आणि आपल काय मत आहे? ह्यासाठी ते महत्वाच असत. तर सनातन प्रभात च्या साईट वर एक लेख आहे, 'शनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश हवाच, अशी धर्मद्रोही मागणी करणार्‍यांना दिलेले समर्पक उत्तर !' ह्या नावाचा. तर ह्यात लेखकाने अश्या काही गोष्टीं मांडल्या आहेत की त्यावर नुसती नापंसंतीच नाही तर विरोध दाखवायला हवा. लेखक एका ठिकाणी म्हणतो की मंदिराच्या गाभाराच पावित्र प्रत्येकाने राखायालाच हव. मग तो पुरुष असो वा महिला. पुढे म्हणतो दारू पिऊन आले पुरुष हाही मंदिरात प्रवेश करू शकत नाही कारण त्याने मंदिर अपवित्र होते. म्हणजे हा लेखक महिलेची तुलाना दारू पिऊन आलेल्या महिलेशी करतोय. मासिक पाळी येण हे दारू पिण्यासारख आहे अस त्याच मत… मित्रांनो हा खूपच घातक विचार आहे. आणि हा कुठून आला, मनुस्मृतीतून आला का आणि कुठून हे ह्या घडीला महत्वाच नाही आहे. महत्वाच हे आहे की हा अज